Adult Film Star Emily Willis हिची प्रकृती चिंताजनक; कुटुंबीयांकडून चाहत्यांना अवाहन
Emily Willis | (Photo Credits: Instagram)

ॲडल्ट फिल्म स्टार एमिली विलिस (Adult Film Star Emily Willis) प्रकृती अस्वस्थ्याने प्रचंड त्रस्त आहे. अलिकडेच तिला हृदयविकारचा झटका आला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एमिली सध्या कोमात गेली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबीयांनी तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्याबाबत महिती देताना सांगितले की, ती सध्या अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. त्यामुळे चाहत्यांनी सर्वात वाईट बातमी ऐकण्यासाठी मन तयार करावे.

एमिलीचे वडील मायकेल विलिस यांनी दिलेल्या महितीनुसार, एमिली कोमात गेली आहे. तिला सध्या श्वाश्वोच्छ्वास करण्यास प्रचंड अडथळा निर्माण होतो आहे. परिणामी तिला जीवन-समर्थन प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. वय वर्षे 25 असल्या एमिली हिचा कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या सहाय्याने श्वासोछ्वास सुरु आहे. रुग्णालयात उपचार घेत असतानाच तिला हृदविकाराचा झटका आल्याचे जाणवले. मात्र, केलेल्या चाचण्यांमध्ये ती सामान्य स्थितीत असल्याचे आढळले. तिला विषबाधा झाली असवी, असा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र, तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची विषविज्ञानचिकीत्सा अहवाल सामान्य आहे. (हेही वाचा, Adult Film Star Sophia Leone Death: अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री सोफिया लिओन हीचं निधन, वयाच्या २६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिची भूक मंदावली होती. त्यामुळे तिने तिचे वय तपासले असता ते केवळ 80 पौंड इतके असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुढचे आढवडाभर एमीली रुग्णालयातच होती. तिच्या वडिलांनी सांगितले की, ती मादक द्रव्याचे सेवन करत होती. मात्र, अलिकडे तिला त्यातून बाहेर पडायचे होते. रुग्णालयातील खर्चासाठी आवश्यक पैशांची कमतरता भासू लागल्याने तिच्या भावाने GoFundMe ऑनलाईन पेज सुरु केले आहे. ज्यातून त्यांनी $600,000 लक्ष्यापैकी $47,162 उभारले आहेत. दरम्यान, एमिलीने ड्रग्जचा ओव्हरडोस घेल्याचे वृत्त आणि चर्चा होती. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी ते नाकारले आहे. तिच्या विविध वैद्यकीय गरजेपोठी ती काही औषधांचे सेवन नियमीत करत असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. (हेही वाचा, हेही वाचा- मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक वयाच्या 92 व्या वर्षी 5 व्यांदा अडकणार विवाहबंधनात,)

एक्स पोस्ट

एमीली ही अडल्ट सिनेमात काम कर असे मात्र दोन वर्षांपूर्वीच तिने त्यातून निवृत्ती घेतली होती. तिला मनोरंजना करिअर करायचे होते. तिची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता तिच्यात होती, असे तिच्या जवळच्यालोकांनी सांगितले. ऑनलाईन पेजमार्फत तिच्यावरील उपचारांसाठी चाहत्यांनी दिलेल्या निधीबद्दल कुटुंबीयांनी आदराची भावना व्यक्त करत धन्यवाद दिले आहेत. तुमचा पाठिंबा आम्हाला एमिलीसाठी धीर धरण्याची आणि स्थिर राहण्याची शक्ती देतो. ज्यांनी देणगी दिली आहे त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आपण केलेली मदत आम्हास मोठ्या प्रमाणात मदत करेल, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.