मराठी रंगभूमी दिन (Photo Credits: File Image)

दर्दी मराठी माणूस राजकारण आणि नाटक या दोन गोष्टींबाबत नेहमीच जागृक असतो असं म्हटलं जातं. आज 5 नोव्हेबर मराठी रंगभूमी दिन (Marathi Rangbhumi Din) ! यंदा कोविड संकटामुळे मागील 6-7 महिने नाट्यगृह, सिनेमागृह बंद आहेत. मात्र कोरोना संकटाने रंगभूमी आणि नाटकांवर आपला प्रभाव पाडला. या संकटकाळात काही नाटकं ऑनलाईन सादर करण्यात आली. खरंतर नाटकाची खरी गंमतच लाईव्ह अ‍ॅक्शन-रिकॅक्शनमध्ये असते पण कोरोनाने यंदा नाटकं सादर करण्याच्या पद्धतीला थोडा छेद दिला. तुम्ही सध्या थिएटर्स मध्ये जाऊन थेट नाटकं बघू श्कात नसलात तरीही तरी यापूर्वी मराठी रंगभूमीवर सादर झालेली काही दर्जेदार नाटकं आता ऑनलाईन उपलब्ध असल्याने यंदाच्या वर्षी तुम्ही मराठी नाटकांचा आस्वाद घरबसल्या घेऊ इच्छित असाल तर पहा कोनती नाटकं तुम्हांला ऑनलाईन युट्युबवर पाहण्याची सोय आहे?

महाराष्ट्रामध्ये 1843 मध्ये सांगलीत मराठी नाटकं सादर होण्यास सुरूवात झाली. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. 1943 साली या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून या नाट्यक्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोषित करण्यात आला होता. मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? जाणून घ्या.

ऑनलाईन मराठी नाटकं!

 

  • तो मी नव्हेच!  

आचार्य लिखित तो मी नव्हेच हे नाटक अजरामर आहे. प्रभाकर पणशीकरांचा 'लखोबा लोखंडे' विशेष गाजला होता.

  • कुसूम मनोहर लेले 

सरोगसी सारख्या विषयावर काळाच्या पुढे जाऊन भाष्य करणारे नाटक रंगभूमीवर विशेष गाजले होते.

  • मोरूची मावशी 

विजय चव्हाण यांना स्त्री वेषात आणि अफलातून कॉमेडी साधण्याची त्यांची किमया पाहण्यासाठी अनेकजण मोरुची मावशी पुन्हा पुन्हा पाहतात. हे एक धम्माल कॉमेडी नाटक आहे.

  • हसवा फसवी 

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना बहुरूपी अंदाजात एकाच नाटकात पहायचं असेल तर हसवा फसवी हे पाहण्याजोगं नाटकं आहे.

 

  • सखाराम बायंडर 
  • विजय तेंडुलकर लिखित सखाराम बायंडर या नाटकाने रंगभूमी गाजवली होती. बहुचर्चित नाटक आता रंगभूमीवर पहायला मिळत नसलं तरीही इथे ऑनलाईन पाहता येईल. 

दरम्यान कोरोनाच्या संकटातून हळूहळू सावरताना आता नाट्यक्षेत्राला देखील दिलासा मिळला आहे. काल मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहं 50% क्षमतेने खुली करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा नाटकाचे प्रयोग सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.