Kalank teaser (Photo Credits: Instagram)

मल्टीस्टारर सिनेमा 'कलंक' (Kalank) मधील सर्व कलाकारांचे लूक समोर आल्यावर प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता 'कलंक' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करण जोहरने (Karan Johar) सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला. हा टीझर शेअर करत करणने लिहिले की, "कलंकचे जग खऱ्या आयुष्यात येत आहे. कलंकचा टीझर तुमच्यासमोर सादर करत आहे."

पहा सिनेमाचा टीझर:

'कलंक' सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातील कहाणी दाखवण्यात आली आहे. सांप्रदायिक दंगली भडकल्यानंतर एका कुटुंबाची होणारी परिस्थिती या सिनेमात पाहायला मिळणार आहे. यात आलिया भट्ट (Alia Bhatt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त (Sanjay Dutt), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि वरुण धवन (Varun Dhawan) या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.