Kalank New Poster: 'कलंक' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर 'आदित्य रॉय कपूर'चा भावुक लूक!
'कलंक' या मल्टीस्टारर सिनेमातील वरुण धवनची पहिली झलक शेअर केल्यानंतर आता आदित्य रॉय कपूरचा सिनेमातील फर्स्ट लूक समोर येत आहे.
'कलंक' (Kalank) या मल्टीस्टारर सिनेमातील वरुण धवनची (Varun Dhawan) पहिली झलक शेअर केल्यानंतर आता आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur) सिनेमातील फर्स्ट लूक समोर येत आहे. वरुण धवनच्या जबरदस्त, बेधडक, बिनधास्त लूकनंतर करण जोहरने (Karan Johar) आदित्य रॉय कपूरचा भावूक लूक शेअर केला आहे. या सिनेमात आदित्य, देव चौधरी (Dev Chaudhry) नावाची भूमिका साकारत आहे. देव चौधरी हा नितळ मन असलेला अतिशय गुणी माणूस आहे.
A virtuous heart with an uncorrupted mind. Presenting Dev Chaudhry. #AdityaRoyKapur #MenOfKalank #Kalank @duttsanjay @Varun_dvn @aliaa08 @sonakshisinha @MadhuriDixit @abhivarman @apoorvamehta18 #SajidNadiadwala @ipritamofficial @foxstarhindi @DharmaMovies @NGEMovies pic.twitter.com/xf9tLgva7g
— Karan Johar (@karanjohar) March 7, 2019
यावरुनच आदित्यची भूमिका ही वरुणपेक्षा वेगळी असल्याचे दिसून येते. आदित्य दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी 'ओके जानू' हा त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. त्यामुळेच 'कलंक' सिनेमातून आदित्य काहीतरी खास करेल, अशी आशा प्रेक्षकांना आहे. 'कलंक' या मल्टी स्टारर सिनेमातील वरुण धवन याचा जबरदस्त लूक आऊट!
'कलंक' या मल्टीस्टारर सिनेमातील दोन अभिनेत्यांचे लूक समोर आल्यानंतर आता कोणाचा लूक येणार याबद्दल प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त (Sanjay Dutt), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि वरुण धवन (Varun Dhawan) या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 19 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2019 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

