Kalank First Look: 'कलंक' या मल्टी स्टारर सिनेमातील वरुण धवन याचा जबरदस्त लूक आऊट!
Varun Dhawan's first look as Zafar in Kalank. (Photo Credits: Twitter)

आलिया भट्ट (Alia Bhatt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त (Sanjay Dutt), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांच्या अभिनयाने सजलेल्या कलंक (Kalank) सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. सर्वप्रथम करण जोहरने (Karan Johar) अभिनेता वरुण धवन याची पहिली झलक सोशल मीडियात शेअर केली आहे. पोस्टरवर वरुणचा हटके अवतार पाहायला मिळत आहे. लांब केस, डोळ्यात आक्रोश, कानात बाली आणि डोळ्यातील काजळ यामुळे वरुण हटके आणि जबरदस्त दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टरमधील वरुणच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा आहे.

करण जोहरने पोस्टर शेअर करत लिहिले की, "वरुणला जफर च्या रुपात सादर करत आहे. तो आयुष्य आणि धोका यांच्याशी फ्लर्ट करतो."

यापूर्वी देखील करणने कलंक सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत एक व्यक्ती आणि महिलेसह बोटीत बसलेली दिसत आहे. वरुणनंतर या सिनेमातील कोणत्या कलाकाराची पहिली झलक समोर येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' सिनेमाची निर्मिती करण जोहर, साजिद नडियादवाला, हिरु यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केले आहे. हा सिनेमा 19 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.