Kalank First Look: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा आगामी चित्रपट 'कलंक' मधील शानदार लूक झळकला
सोनाक्षी सिन्हा (Photo Credits: Instagram)

Kalank First Look: करण जोहर (Karan Johar) याचा आगामी चित्रपट 'कलंक' (Kalank) यामधील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या लूक नंतर आता सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचा शानदार लूक सोशल मीडियावर झळकला आहे. या चित्रपटात सोनाक्षी ही खुपच सुंदर दिसत असून डोक्यावर लाल रंगाची टिकली, सिंदूर आणि कानात झुमके असलेला फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

ट्वीटरवरुन याबाबत सोनाक्षी हिने ट्वीट करत असे लिहिले आहे की, 'प्रेम, सहनशीलता, अखंडता आणि बलिदान यासाठीच सत्या खरी ठरते.(हेही वाचा-Kalank First Look: 'कलंक' चित्रपटातील आलिया भट्ट हिची भुमिका म्हणजे मोहक रुपाचा नजराणा)

तर आज जागतिक महिला दिनानिमित्त या चित्रपटातील आलिया भट्ट हिच्या सुद्धा लूकची झलक पाहायला मिळाली आहे. तर गुरुवारी वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या लूकची झलक दाखवण्यात आली.

या चित्रपटाचे निर्देशन अभिषेक वर्मन करत आहे. तसेच धर्मा प्रोडक्शन निर्मित कलंक चित्रपटाचे पोस्टर झळकवण्यात येत आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.