Priyanka Chopra (Photo Credits: Instagram)

2023 पासून न्यूयॉर्क (New York) शहरातील सार्वजनिक शाळांना (Public School) दिवाळीची सुट्टी (Diwali Holidays to School) देण्यात येईल.  महापौर एरिक अॅडम्स म्हणाले की यामुळे शहराच्या समानतेचा संदेश जातो. तसेच न्युयॉर्क शहरात मुळ भारतीय वंशाच्या असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे न्युयॉर्क शहरातही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केल्या जाते. म्हणून एवढ्या वर्षांनंतर न्यूयॉर्कच्या शाळांना दिवाळी (New York School Holidays) निमित्त सुट्टी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिवाळीची सुट्टी देणं म्हणजे न्यूयॉर्क मधील नव्या पिढीला दिवाळ सण काय आणि तो साजरा कसा केला जातो हे देखील शिकता येईल. भारतीय-अमेरिकन (Indian American) समुदायाची ही प्रलंबित मागणी होती. तरी न्यूयॉर्कच्या या मोठ्या निर्णयामुळे भारतीय सण, संस्कृती, परंपरा, वारसा ह्याची चर्चा जगभरात होत आहे. तरी भारतीय अभिनेत्री आणि अमेरीकेची सुन प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

 

अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Official Instagram) पेजवर यासंबंधीत स्टोरी शेअर (Story Share) केली आहे. ज्यात तिने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रियांका वयाच्या 13 व्या वर्षी शिक्षणासाठी (Education) अमेरिकेत (America) गेली. ती तिच्या मावशीसोबत राहत होती आणि क्वीन्स, न्यूयॉर्क नंतर न्यूटन, मॅसॅच्युसेट्स आणि आयोवा येथील सीडर रॅपिड्स येथील शाळांमध्ये शिकली. तेव्हा प्रियंका दरवर्षी भारताच्या दिवाळ सणाला मिस करायची. (हे ही वाचा:- Bigg Boss 16 चं सुत्रसंचालन आता करण जोहर करणार, जाणून घ्या भाईजान सलमान खानने का घेतली शोमधून अर्धावरती एक्झिट?)

 

प्रियंकाच्या (Priyanka chopra) शालेय जिवनात अमेरीकेत शिकत असताना तिला कधीही  सुट्ट्या मिळाल्या नाही. पण यावर्षी पुढील वर्षिपासून न्यूयॉर्कमधील (New York) शाळेला सुट्ट्या मिळणार असल्याने प्रियंकाने आनंद व्यक्त केला आहे. प्रियंकाने शेअर केलेल्या स्टोरीत ती म्हणाली आहे की न्यूयॉर्कमध्ये दिवाळीची सुट्टी जाहीर केल्यानं आज बालपणातील प्रियंकाला आनंदाश्रू आले.