Bigg Boss 16 चं सुत्रसंचालन आता करण जोहर करणार, जाणून घ्या भाईजान सलमान खानने का घेतली शोमधून अर्धावरती एक्झिट?

गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बॉस (Bigg Boss) आणि सलमान खान (Salman Khan) हे समीकरण आपण सगळेचं छोट्या पडद्यावर बघत आहोत. पण आता बिग बॉसचा सोळावं सिझन होस्ट (Host) करत असताना अभिनेता सलमान खान काल प्रदर्शित झालेल्या भागात दिसला नाही. म्हणून सलमानने अचानक या बहुचर्चित शोमधून एक्झिट (Exit) घेण्याचं कारण काय अशी सलमानसह बिग बॉसच्या फॅन्समध्ये मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) ऐवजी दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आता बिग बॉसचं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. गेल्या वर्षी करण जोहरने बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन होस्ट केला होता. ओटीटी बिग बॉसची (Bigg Boss OTT)  पहिली विजेती दिव्या होती तर कोरिओग्राफर निशांत भट उपविजेता आहे. कलर्स टीव्हीने एक नवा प्रोमो (Promo) जारी केला आहे ज्यामध्ये करण जोहर बिग बॉसचा शनिवारचा भाग होस्ट करताना दिसत आहे.

 

तरी अभिनेता सलमान खानने (Actor Salman Khan) बिग बॉसमधून (Bigg Boss) अशी अचानक एक्झिट (Exit) घेण्याचं कारण म्हणजे सलमानला डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याने तो आजारी आहे. गेल्या चार दिवसांपासून सलमानची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला योग्य विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शनिवारी करण जोहर सलमानच्या जागी वीकेंड (Weekend Ka War) का वार होस्ट करणार आहे. (हे ही वाचा:- Jacqueline Fernandez: अभिनेत्री जैकलीन फर्नांडीस हिला पटियाला कोर्टाकडून अंतरीम जामीन मंजूर)

 

पुढील काही आठवडे अभिनेता सलमान खान बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये दिसणार नाही. बिग बॉस या कार्यक्रमातील ताक झाक तर प्रेक्षकांना आवडतेच पण विकेंडला येणाऱ्या सलमान खानची आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र आता पुढचे काही आठवडे सलमान खान बिग बॉसच्या सेटवर दिसणार नाही म्हणून सलमानच्या फॅन्सकडून दुख व्यक्त करण्यात येत आहे.