होळीच्या वेळी कार आणि बाइक्सचा रंगांपासून बचाव करण्यासाठी 'या' टीप्स येतील कामी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits- Facebook)

सर्वत्र होळी आणि धुलीवंदनाचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच होळीच्या वेळी हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांपासून जरा जपूनच राहिलेले बरे. कारण बहुतांश वेळेस रंगपंचमीच्या वेळी तुमच्या कार आणि बाईक्सवर रंगांची उधळण केली जाते. रंग तुमच्या गाडीवर टाकल्यास होळी नंतर सुद्धा ते जात नाहीत. अशातच तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने तुमच्या वाहनांचा रंगापासून बचाव करु शकता. त्याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला होळीच्या रंगापासून तुमच्या वाहनांचा बचाव करता येईल.

जर तुम्ही तुमचे वाहन खुल्या जागी पार्किंग केले असाल आणि तुमच्याकडे वॉटरप्रुफ कव्हर असल्यास त्याचा होळीच्या वेळी वापर करा. लक्षात ठेवा वॉटरप्रुफ कव्हर असू द्या कारण पाण्यापासून सुद्धा त्याचा बचाव होणार आहे. मात्र वॉटरप्रुफ कव्हर तुमच्याकडे नसल्यास गाडीला जरी साधे कव्हर टाकल्यास त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे.(सिंगल चार्जमध्ये 60 किमीची जबरदस्त रेंज देणार Detel ची इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

होळीच्या वेळी नातेवाईकांकडे गेल्यास तेथे तुमच्या वाहनाला रंग लागल्यास चिंता करु नका. कारण रंग काढण्यासाठी उत्तम दर्जाच्या शॅम्पूचा वापर तुम्ही करु शकता. याचा फायदा तुम्हाला गाडीवर लागलेला रंग काढण्यासाठी होईल.यानंतर तुम्ही गाडीवर शाइनिंग किंवा पॉलिशचा सुद्धा वापर करु शकता.(One Wheel Electric Bike: चिनी ई-कॉमर्स ग्रुप अलीबाबा ने लाँच केली 'वन व्हील इलेक्ट्रिक बाईक'; जाणून घ्या किंमत आणि खास स्पेसिफिकेशन्स)

तुम्ही मित्रांना भेटण्यासाठी जात असाल त्यावेळी तुम्हाला रंग लावला गेल्यास तुमच्या गाडीच्या सीटसह, गिअयरबॉक्स, स्टिअरिंगवर सुद्धा रंग लागू शकतो. अशावेळी तुम्ही गाडीच्या महत्वाच्या पार्ट्सवर जाड कपडा बांधू शकता. त्याचसोबत सीटवर जुना कापड घालून तुम्ही फिरु शकता.