One Wheel Electric Bike (PC - You Tube)

One Wheel Electric Bike: आपण आतापर्यंत अनेक डिझाईनच्या दुचाकी किंवा स्कूटर पाहिल्या असतील. परंतु आपण कधीही एक चाक असलेली दुचाकी पाहिली आहे का? चिनी दिग्गज ई-कॉमर्स ग्रुप अलिबाबा ने वन-व्हील इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. कदाचित यापूर्वी तुम्ही सर्कसमध्ये एक चाक असलेले वाहन पाहिले असेल. परंतु, आता तुम्ही एक चाक असलेली बाईक रस्त्यांवर धावताना पाहण्यास सक्षम असणार आहात.

इलेक्ट्रिक वाहन बाजार जगभरात वेगाने वाढत आहे. त्यामुळे अलिबाबाने इलेक्ट्रिक वाहन विभागातही नवी सुरुवात केली आहे. या समूहाने अलीकडेचं चीनच्या सरकारी मालकीच्या ऑटो-मोबाइल कंपनी SAIC च्या संयुक्त विद्यमाने नवीन इलेक्ट्रिक कारची घोषणा केली आहे. या इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात वायरलेस चार्जिंग असेल. म्हणजेच, कारची बॅटरी वायरशिवाय चार्ज केली जाऊ शकते. (वाचा - 2021 Royal Enfield Classic 350 दमदार डिझाइनमध्ये लॉन्च, मिळणार 'हे' दमदार फिचर्स)

बाईक डिझाइन -

या नवीन वन व्हील बाईकमध्ये पारंपारिक स्टील ट्रेलिस फ्रेम आणि फॉक्स इंधन टाकी आहे. बाईकची टँक डिझाइन डुकाटी मॉन्स्टरची अनुभूती देते. विशेष म्हणजे या बाईकला मागील बाजून पिलियन सीटही देण्यात आलं आहे.

वेग आणि वजन -

या सिंगल-व्हील इलेक्ट्रिक बाईकमध्ये पुरवलेली इलेक्ट्रिक मोटर दोन हजार वॅटची उर्जा निर्माण करते. या बाईकची टॉप स्पीड ताशी 48 किलोमीटर आहे. या बाईकमध्ये दुसरे चाक नसल्याने ही बाईक किती स्थिर चालेल हे सांगणे कठीण आहे. या बाईकचे वजन केवळ 88 पौंड (40 किलो) आहे. त्यामुळे ही बाईक सायकलनंतरचे सर्वात हलके साधन ठरणार आहे.

बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज -

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये पॅनासोनिक बॅटरी पॅक उपलब्ध आहे. पूर्ण चार्जिंगवर ही बॅटरी 60 ते 100 किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 3 ते 12 तासांचा कालावधी लागतो.

व्हिडिओ पहा -

किंमत -

या एक चाकाच्या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1,500 डॉलर्स आहे. जे भारतीय चलनानुसार अंदाजे 1.09 लाख रूपये इतकी आहे.