फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून बायकोने नवऱ्याला जिवंत जाळले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Indonesia : पती पत्नीच्या नात्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन भांडण होत असते. परंतु काही वेळेस दोघे समजून घेतात तर काही नवरा बायकोचे भांडण एवढे विकोपाला जाते की त्यावर तोडगा काढणे अशक्यच असते. अशाच पद्धतीची एक घटना इंडोनेशिया येथे घडली आहे.

रिपोर्ट्सनुसार, एका इंडोनेशिन दापंत्यांच्या वैवाहिक जीवनात साध्या मोबाईलच्या पासवर्डवरुन जोरदार भांडण झाले.डेडी पुरनामा असे या तरुणाचे नाव आहे. डेडी हा घराच्या छतावर काम करत होता. त्यावेळी बायकोने त्याच्याकडे मोबाईलचा पासवर्ड काय आहे हे विचारले. परंतु डेडीने बायकोला पासवर्ड देण्यास नकार दिल्याने बायको संतापली. या संतापाच्या भरात बायकोने डेडीवर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या प्रकरणी डेडी याचा मृत्यू झाला आहे.(हेही वाचा-विकृत नवऱ्याच्या सुखाची तृप्ती करण्यासाठी क्रूर आईने 4 महिन्यांच्या बाळाची 28 हाडे तोडली )

या भांडणापायी बायको नवऱ्याला आयुष्यभरासाठी गमावून बसली आहे. तर पोलिसांनी डेडीच्या बायकोला अटक केली असून तिच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.