कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या (Conservative Party) नेत्या लिझ ट्रस (Liz Truss)यांनी ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. पक्षाने केलेला जनादेश पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने आपण राजीनामा दिल्याचं लिझ ट्रस (Liz Truss Resignation) यांनी म्हणटलं आहे. वाढती महागाई (Inflation) आणि फसलेली कर रचना यामुळे लिझ ट्रस (Liz Truss) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस सर्वात कमी कार्यकाळ असणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत. सध्या त्या ब्रिटनच्या काळजीवाहू पंतप्रधान असल्या तरी आता लवकरच ब्रिटेनचा नवा पंतप्रधान ठरवल्या जाणार आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या नावाची मोठी चर्चा होत आहे. तरी उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या 100 कंझर्वेटिव्ह नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. आता ब्रिटेनचे पुढील पंतप्रधान ऋषी सुनकचं होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 24 ऑक्टोबर रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
लिझ यांच्या राजीनाम्यानंतर (Liz Truss Resignation) ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान (Prime Minister) कोण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक नावे आहेत. यामध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांचं नाव पुढे आहे. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला आठवडाभरात ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान निवड करावी लागणार आहे. (हे ही वाचा:- Liz Truss Resigns: लिझ ट्रस यांनी युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा, अयशस्वी कर-कपात अर्थसंकल्पामुळे घेतला निर्णय)
कोण आहेत ऋषि सुनक?
ऋषी सुनक यांचे पालक आजी-आजोबांसोबत ब्रिटनला (Britain) गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड (Oxford) विद्यापीठातून तत्त्वज्ञान ,राजकारण, आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं. नंतर स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं (MBA) शिक्षण पूर्ण केलं.राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ची एक गुंतवणूक कंपनी स्थापन केली. ते सरकारमध्ये आधी ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. नंतर ते ब्रिटेनचे अर्थमंत्री झालेत. अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.