India's Decision to Buy S-400 Missile System Will Further Destabilise Region: Pakistan (Photo Credit: PTI/File)

S400 Missile Defense System: रशियाकडून एस 400 मिसाइल संरक्षण प्रणाली (S400 missile defense system) खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेचा तीळपापड झाला आहे. भारत-रशिया (India - Russia)  यांच्यातील हा संरक्षणविषयक व्यवहार अमेरिकेला फारसा आवडला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने भारताला इशारा दिला आहे की, या संरक्षण सामग्री खरेदी व्यवहाराचा अमेरिका - भारत संबंधाव गंभीर परिणाम होईल. S400 Missile मध्ये जमीनीवरुन हवेत मारा करण्याची क्षमता आहे. तसेच हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक असल्याने संरक्षणविषयक सर्व फिचर्सनी सज्ज आहे. संरक्षण विश्वातील आज घडीचे हे एक सर्वात अद्ययावत क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्र खरेदीबाबत सर्वप्रथम चीन आणि रशिया यांच्यात करार झाला होता. हा करार 2014 मध्ये झाला होता. त्यानंतर आता भारतानेही हा करार केला आहे.

S400 Missile खरेदीबाबत भारत आणि रशिया यांच्यात ऑक्टोबर 2018 मध्ये पाच अरब डॉलर्स इतक्या प्रचंड रकमेचा करार झाला होता. हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशीयाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात सविस्तर झालेल्या चर्चेनंतर करण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, भआरत रशियाकडून S400 Missile खरेदी करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. (हेही वाचा, एक राऊंड 36 वार: भारत-रशिया S-400 खरेदी करार: काय आहेत वैशिष्ट्ये?)

दरम्यान, S400 Missile हा भारत रशिया करार प्रत्यक्षात उतरला तर भारत अमेरिका संबंधावर त्याचा परिणाम होऊ शकतो. परिणामांच्या रुपात अमेरिका भारतावर निर्बंध लादू शकतो. मात्र, हे निर्बंध अर्थिक स्वरुपाचे असतील की इतर कोणत्या याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. (हेही वाचा, भारत, रशियामध्ये S-400डील; अमेरिकेला चिंता, कारण..)

अमेरिकी काँग्रेसने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी रोखण्यासाठी एक 'काउंटरिंग अमेरिकाज एडवर्सरीज थ्रू सेंक्शंस अॅक्ट (सीएएटीएसए)' ( Countering America's Adversaries Through Sanctions Act, CAATSA)बनवला होता. या कायद्याचा वापर करुनच अमेरिका या करारावर निर्बंध घालू पाहात होता.