कोरोना व्हायरसचे (Coronavirus) देशावरील संकट पाहता विविध स्तरातून मदत केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता अमेरिकेने(US) सुद्धा भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताला आरोग्य सहाय्यता निधीच्या रुपात 448 कोटी रुपयांची मदत अमेरिकेकडून करण्यात आली आहे. भारतात ही रक्कम कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी आणि आपत्कालीन गोष्टींसाठी देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटाबाबत प्रयत्न केले जात असून अमेरिकेने असे म्हटले आहे की, गेल्या 20 वर्षात युएसने भारताला जवळजवळ 21,280 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामधील 10,640 कोटी रुपये आरोग्य सहाय्यतासाठी दिले आहेत.विदेश मंत्रालय आणि अमेरिकेची एजेंसी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांनी आता पर्यंत आपत्कालीन आरोग्य, मानवीय आणि आर्थिक सहाय्यतासाठी 50 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक मदतीसाठी वचन दिले आहे.
दक्षिण आशिया मध्ये अमेरिकाने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अफगाणिस्तानासाठी 80 लाख डॉलर, बांग्लादेशासाठी 96 लाख, भुटानसाठी 50 लाख, नेपाळ 18 लाख रुपयांची मदत केली आहे. तर अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाखाच्या पार गेला आहे. बाल्टीमोर स्थित जॉन्स हॉप्किन्स विश्वविद्यालय यांच्यानुसार, जगातील कोणत्याही देशात संक्रमणाची प्रकरणे आणि मृतांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेत आहे. अमेरिकेत कोविड-19 चे शुक्रवारी 7 लाखाहून अधिक प्रकरणे आणि 36 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.(Coronavirus: कोरोनाच्या संकटामुळे डोलारा कोसळण्याचा धोका; जगभरातील 100 पेक्षाही अधिक राष्ट्रांना हवीय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडू मदत)
तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष बिल गेट्स यांनी जागतिक महारोगराई कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान अमेरिकेने डब्लूएचओ यांचे फंडिंग थांबवल्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून याचे परिणाम भयंकर होण्याची शक्यता असल्याचे ही म्हटले आहे. कोरोना व्हायरस सारख्या महारोगाच्या काळाच डब्लूएचओ यांचे फंडिंग थांबवणे खतरनाक आहे.डब्लूएचओ यांच्याकडून करण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत केली जात आहे. परंतु जर डब्लूएचओ यांचे काम थांबल्यास अन्य कोणतीही दुसरी संगठना त्यांची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे सध्या डब्लूएचओ यांची अधिक गरज असल्याचे म्हटले होते.