UK: ब्रिटेनकडून सर्व देशांना प्रवासाच्या Red List मधून काढले बाहेर, नागरिकांना 10 दिवसांच्या क्वारंटाइन पासून मिळणार दिलासा
विमानप्रवास (photo Credits : pexels.com )

ब्रिटेनकडून गुरुवारी प्रवासासंदर्भात एक घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या रेड लिस्ट मधून अंतिम सात देश- कोलंबिया, डोमिनिकन, रिपब्लिक, इक्वाडो, हॅती, पनामा, पेरु आणि वेनेजुएलाला बाहेर केले आहे. आता कोविडवरील लस घतलेल्या नागरिकांना ब्रिटेनमध्ये प्रवास करायचे असेल तर त्यांना सरकारद्वारे निवडलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन रहावे लागणार नाही आहे. हा नियम सोमवार पासून लागू केला जाणार आहे. त्यानंतर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवशांना ब्रिटेन मध्ये आल्यास 10 दिवसांसाठी क्वारंटाइन सुद्धा रहावे लागणार नाही आहे.

परिवहन मंत्री ग्रांट शेप्स यांनी म्हटले की, रेड लिस्ट लागूच असणार आहे. कारण याचा भविष्यासह उपाययोजनेसाठी वापर करता येईल. त्यांनी असे म्हटले की, 30 हून अधिक देशात दिली जाणाऱ्या लसीला ब्रिटेन सुद्धा मंजूरी देणार आहे. त्यांतर अशा देशांची संख्या 135 होणार आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, आम्ही आता असे करत आहोत कारण जे वेरियंट्स ऑफ कंसर्न्स संदर्भात आम्ही दीर्घकाळापासून चिंतेत होतो. आता त्यावर अधिक चिंता करण्याची गरज नाही.(Covid-19 चाचणी करण्याची आहे ठराविक वेळ; दिवसातील वेळेनुसार बदलू शकतात निकाल- Study)

मंत्र्यांनी असे म्हटले की, डेल्टा वेरियंट आता जगातील बहुतांश देशात पोहचला आहे. स्कॉटलँन्ड, वेल्स, उत्तर आयरलँन्डच्या सरकारने पुष्टी केली की, इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रवासाठी लागू करण्यात आलेले नियम येथे सुद्धा फॉलो करावे ज्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे. मंत्रालयाने असे म्हटले, रेड लिस्टची प्रत्येक तीन आठवड्यांनी समीक्षा केली जाणार आहे. यामध्ये कोणत्याही देशला जोडणे किंवा हचवण्यापूर्वी तेथील नवा वेरियंट्स संबंधित डेटा पाहिला जाऊन त्याची निगराणी केली जाईल.