प्रिन्स फिलिप (फोटो सौजन्य- ट्वीटर)

ब्रिटेनचे प्रिन्स फिलिप (Price Philip) यांच्या कारला अपघात झाला. परंतु प्रिन्स फिलिप सुदैवाने बचावले आहेत. सैंडीग्राम इस्टेट परिसरात फिलिप यांच्या कारला अपघात झाला होता.

गुरुवारी प्रिन्स फिलिप गाडी चालवत होते. त्यावेळी त्यांच्यासह दोन व्यक्ती कारमध्ये होत्या. त्यावेळी हा अचानक अपघात झाल्याने तिघांना गंभीर जखमा झाल्या आहेत. याबद्दलची माहिती बकिंघम पॅलेसने दिली आहे. तर अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती आता सुखरुप असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

अनेक देशांमध्ये कार चालवण्यासाठी एक वयोमर्यादा ठरविण्यात आलेली आहे. परंतु ब्रिटेनमध्ये कार चालवण्यासाठी ठराविक वयोमर्यादा ठरविण्यात आलेली नाही.