Elon Musk | (PC - Twitter)

टेस्लाचे (Tesla) सीईओ (CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी  ट्विटरमध्ये (Twitter)  गुंतवणूक केल्यानंतर एप्रिल (April) महिन्यात खुद्द ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट (Micro Blogging Site) ट्विटर  कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. ट्विटर विकत घेण्यासाठी मस्क आणि ट्वीटरमध्ये 44 अब्ज डॉलरचा करार केला केला गेला. पण अचानक ट्विटर (Twitter) विकत घेण्याचा करार एलॉन मस्क (Elon Musk) यांनी रद्द केला. मस्क यांच्या घोषणेमुळे ट्विटरचे शेअर्स (Shares) 6 टक्क्यांनी घसरले असुन आता ट्विटर बोर्डाचे चेअरमन (Twitter Board Chairman) ब्रेट टायलो (Bret Taylor) यांनी मस्क यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली असुन आता एलॉन मस्क (Elon Musk) विरुध्द ट्वीटर (Twitter) असा सामना न्यायालयात रंगला आहे.

 

पण गेल्या सुनावणीत एलॉन मस्क (Elon Musk) यांची बाजू ट्वीटरवर (Twitter) चांगलीच भारी पडली आहे. मस्कने (Elon Musk) ट्विटरला बॉट अकाऊंट (Bot Account) तपासण्यासाठी तपशील मागितला, तेव्हा अमेरिकन सोशल मीडिया (Social Media) कंपनी ट्विटरने नकार दिला होता.पण आता न्यायालयाने ट्विटरला गेल्या वर्षी सर्वेक्षण केलेल्या 9,000 खात्यांचे तपशील शेअर (Share) करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने बॉट खात्यांचे तपशील शेअर करण्याबाबत आदेश जारी केला आहे. एलॉन मस्कच्या याचिकेवर (Elon Musk Appeal), ट्वीटरने बॉट खात्यांची (Bot Account) माहिती मस्कला शेअर करावी, असे आदेश दिल्याचे वृत्त ब्लूमबर्गने प्रकाशीत केले आहे.

 

ट्विटर (Twitter) आणि मस्क (Elon Musk) यांच्यात झालेल्या करारानुसार  हा करार रद्द झाल्यास  मस्क यांना 1 अब्ज डॉलर ब्रेक-अप रक्कम (Break Up Amount) ट्विटरला द्यावी लागले.  पण आता एलॉन मस्क यांना फक्त ब्रेक अप रक्कम देऊन चालणार नाही तर करारातील  काही अटी अशा होत्या ज्यानुसार मस्क यांच्यावर ठरलेला करार पूर्ण करण्याची सक्ती केली जाऊ शकते. तर निकाल मस्क यांच्या बाजूने लागल्यास चित्र वेगळं असु शकतं. याचा अर्थ आता मस्क (Elon Musk)  आणि ट्विटर (Twitter) यांच्यातील कायदेशीर लढाई लांब काळ चालणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. एलॉन मस्क विरुध्द ट्वीटर (Elon Musk Vs Twitter) या खटल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.