Turkey: अंकारामधील संसद भवनाजवळ आत्मघाती स्फोट, 2 पोलीस जखमी, Watch Video
Turkey Suicide Blast (PC- Twitter/@AlArabiya_Eng)

Turkey: तुर्कस्तानची राजधानी अंकारा (Ankara) मध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त असून अल्जझिराने दिलेल्या वृत्तानुसार, अंकारा येथील संसदेजवळ हा बॉम्बस्फोट (Blast) झाला. तुर्कीच्या अंतर्गत मंत्र्यांनी बॉम्बस्फोटांना दुजोरा दिला असून तुर्कीच्या राजधानीत एका मंत्रालयाच्या इमारतीसमोर आत्मघाती हल्लेखोराने स्फोटक यंत्राचा स्फोट केला, ज्यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. मंत्रालयाच्या इमारतीसमोर दोन हल्लेखोरांनी स्फोट घडवून आणल्याचे गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी सांगितले. त्यापैकी एकाने स्वत:ला उडवले आणि दुसरा 'डिफ्युज' झाला, असे मंत्री म्हणाले. अल जझीराचे रिपोर्टर सिनेम कोसोग्लू यांनी सांगितले की, सकाळी साडेनऊच्या सुमारास हा स्फोट झाला.

कोसोग्लू यांनी सांगितले की, संसद भवन आणि गृह मंत्रालयाच्या इमारतीभोवती सुरक्षा उपाय कडक करण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर संसद पुन्हा सुरू होत आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्यासह सर्व खासदार दुपारी 2 च्या सुमारास संसदेत पोहोचतील अशी अपेक्षा होती, पण त्यापूर्वीच बॉम्बस्फोट झाला. (हेही वाचा - Additional Director General Of Pakistan ISI: पाकिस्तानच्या ISI च्या अतिरिक्त महासंचालक म्हणून Dawood Ibrahim Kaskar ची नियुक्ती)

अल जझीराच्या वार्ताहराने सांगितले की, हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. तुर्की अधिकारी ISIL (ISIS) सदस्यांविरुद्ध मोहीम राबवत असताना हा हल्ला झाला आहे.