Dawood Ibrahim (PC -Facebook)

Additional Director General Of Pakistan ISI: मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद इब्राहिम कासकर (Dawood Ibrahim Kaskar) याला पाकिस्तानची हेरगिरी एजन्सी इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) चे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 'फ्री प्रेस जर्नल'ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केलं आहे. दाऊद 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात दुबईला पळून गेला. जिथे त्याला आयएसआयने आश्रय दिला. तसेच दाऊदने 12 मार्च 1993 रोजी मुंबईतील प्राणघातक मालिका बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी गुप्तहेर संस्थेला मदत केली. त्यानंतर त्याने कराचीला तळ हलवला, जिथे त्याला ISI द्वारे संरक्षण देण्यात आले. तेव्हापासून तो पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना आणि जगभरातील त्यांच्या सहयोगींसाठी काम करत आहे.

दाऊदला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. त्याचा अल कायदा, ओसामा बिन लादेन आणि तालिबानशी संबंधित होता. तो दहशतवादी नेटवर्कचा वापर करून अमली पदार्थांच्या तस्करीच्या मोठ्या साम्राज्याला चालना देत आहे. ड्रग्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग आयएसआयच्या दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वापरला जातो. (हेही वाचा - Pakistan Blast: बलुचिस्तान मध्ये ईद च्या सेलिब्रेशन दरम्यान स्फोट; 34 ठार, जखमींचा आकडा 130 च्या पार)

दरम्यान, यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने आधीच दाऊदला कार्यकारी आदेश 13224 अंतर्गत जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त केले आहे. यूएस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दाऊदने गेल्या दोन दशकांमध्ये अल-कायदा आणि संबंधित गटांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय अंडरवर्ल्डमधील सर्वात प्रमुख गुन्हेगार म्हणून आपल्या स्थानाचा वापर केला आहे. विशेषतः त्याचे गुन्हेगारी सिंडिकेट अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेले आहे. तसेच दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतून त्याचे तस्करीचे मार्ग ओसामा बिन लादेन (मृत) आणि त्याच्या दहशतवादी नेटवर्कसह जोडले गेलेले आहे. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात दाऊद तालिबानच्या संरक्षणाखाली अफगाणिस्तानला गेला.

फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दाऊद सीमेपलीकडून अमली पदार्थांच्या तस्करीत आयएसआयसोबत काम करत आहे. त्याचा उजवा हात छोटा शकील आता रिअल इस्टेट, बॉलीवूड आणि इतर क्षेत्रांमध्ये त्याचा बराचसा व्यवसाय हाताळतो. तर त्याचा भाऊ अनीस इब्राहिम आखाती आणि मध्य पूर्वेतील व्यवसायांवर देखरेख करतो. मुंबई, अहमदाबाद आणि इतर शहरांमध्ये दाऊदचे नेटवर्क आहे. तो आयएसआयला भारताच्या विविध भागांमध्ये हेरगिरीच्या कारवाया करण्यासाठी वापरण्याची परवानगी देतो. मुंबईतील अनेक बिल्डर शकीलने दिलेल्या पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे दुबई किंवा काठमांडूमार्गे पाकिस्तानात जात असल्याची माहिती आहे.