Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

जगभरातील अनेक महिला गर्भनिरोधक औषधे (Contraceptives) तोंडावाटे घेतात. ती घ्यावयास जरी सोपी आणि सामान्य असली तरी त्याचा महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. कॅनडा-आधारित विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या अलीकडील अभ्यासात आढळून आले आहे की, अशा प्रकारे औषधे घेणे हे, महिलांच्या मेंदूच्या प्रक्रियांवर (Women's Brain Processes), विशेषतः त्यांच्या भीती-नियंत्रण यंत्रणेवर मोठा परिणाम होऊ शकतो. तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांमधील (Oral Contraceptives) कृत्रिम संप्रेरकांमुळे महिलांच्या भीतीशी संबंधित मेंदूच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो. संशोधकांनी केलेल्या अभ्यासात संप्रेरक असलेले एकत्रित गर्भनिरोधक (COCs) वापरण्याचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम आणि भीतीवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार असलेल्या न्यूरल सर्किटरी या दोन्हींचा शोध घेण्यात आला.

गर्भधारणा रोखण्यासाठी तोंडावाटे घेतली जाणारी औषधे सामान्यतः गर्भनिरोधक गोळ्या म्हणून ओळखल्या जातात. जी सामान्यत: स्त्री लैंगिक संप्रेरके असतात. ज्यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन यांचा समावेश असतो, ज्याचा उद्देश नको असलेली गर्भधारणा रोखणे आहे. "Frontiers in Endocrinology" या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या पहिल्या लेखिका आणि Université du Québec à Montréal मधील संशोधक अलेक्झांड्रा ब्रुइलार्ड यांच्या मते, "आमच्या संशोधनात आढळून आले आहे की, COCs स्त्रियांमध्ये भावनांचे नियमन बिघडू शकते."

अभ्यासासाठी, संशोधकांनी 23-35 वर्षे वयोगटातील 180 सहभागींना चार गटांमध्ये नियुक्त केले. ज्यामध्ये सध्या COCs वापरणाऱ्या महिला, ज्या स्त्रिया आणि पुरुष पूर्वी COCs वापरत होत्या परंतु अभ्यासाच्या वेळी नाही. ज्या स्त्रिया कधीही हार्मोनल गर्भनिरोधक वापरत नाहीत. सीओसी लिहून दिल्यावर, मुली आणि स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळी आणि ओव्हुलेशनवर लैंगिक हार्मोन्सचा कसा परिणाम होऊ शकतो यासारख्या विविध संभाव्य शारीरिक दुष्परिणामांबद्दल माहिती दिली जाते. या लैंगिक संप्रेरकांचा मेंदूच्या विकासावर होणारा परिणाम, जो प्रौढावस्थेतही सुरू राहू शकतो, असे संशोधकांनी सांगितले.