Singapore Accident: सिंगापूरहून (Singapore) क्वालालंपूरला जाणाऱ्या बसची मोटारसायकलला धडक बसल्याने आग लागली. या दुर्घटनेत एका भारतीय वंशाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. हा अपघात 13 जानेवारी रोजी पहाटे 3.50 वाजता उत्तरेकडे झाला. बसमध्ये 28 प्रवाशी प्रवास करत होते. धडक एवढ्या जोरात होती की, बसला अचानक आग लागली. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक सेवा काही काळ ठप्प राहिली होती.( हेही वाचा- रस्ता अपघातात व्यावसायिकाला गंभीर दुखापत, मदत करण्याऐवजी लोकांनी लुटले पैसे)
माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून एक बस जात होती. दरम्यान बसची धडक दुचाकीला लागली. या आगीत एकाचा मृत्यू आणि तीन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तात्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्शद अबू यांनी सांगितले. मृत झालेली मुलगी ही भारतीय वंशाची होती. बसच्या आगीच भारतीय वंशाची मुलगी भाजली होती. तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
Singapore-Kuala Lumpur bus crash ends up in flames; Passenger from India died, 6 injured#latest #vanakkammalaysia #Singapore #KualaLumpur #bus #crash #ends #up #flames #Passenger #from #India #died #6 #injured #trendingnewsmalaysia #malaysiatamilnews #fyp pic.twitter.com/061VMuAN5O
— Vanakkam Malaysia (@vmnews) January 13, 2024
बसच्या मागच्या सीटवर अडकलेल्यामुळे आणखी तीन जण या आगीत भाजले गेले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस तपसानुसार, बसने मोटारसायकलला धडक दिली आणि बसला आग लागली. या आधी झालेल्या अपघातामुळे दुचाकी चालकाचा ताबा सुटला होता. या अपघातामुळे परिसरात मोठी हळबळ उडाली. या आगी बस संपुर्ण जळून खाक झाली आहे.