प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

मांसाहार (Non Vegetarian) करणारे लोक आणि प्राणी हक्क गट यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. प्राणी वाचवू पाहणारे गट शाकाहारी किंवा व्हिगन होण्यास प्रोत्साहन देत आहेत. पण आता मांस खाणाऱ्या लोकांसोबत सेक्स (Sex) करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. प्राणी हक्क समूह पेटाने (PETA) ही मागणी केली आहे. संघटनेच्या जर्मन युनिटने मांस खाणे हे 'टॉक्सिक मर्दानी'चे लक्षण असल्याचा दावा केला आहे. पेटा महिलांना 'जग वाचवण्यासाठी' सेक्स स्ट्राइकवर जाण्याचे आवाहन करत आहे.

PETA अधिकारी डॉ कॅरेज बेनेट यांनी दावा केला की. पुरुष महिलांपेक्षा 41 टक्के अधिक हरितगृह वायू उत्सर्जित करतात, कारण ते महिलांपेक्षा जास्त मांस खातात. संस्थेकडून जर्मनीतील मुलींना सांगितले जात आहे की, जोपर्यंत त्यांचे प्रियकर किंवा पती मांसाहार करणे थांबवत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवू नयेत. टाइम्स रेडिओशी बोलताना डॉ. बेनेट म्हणाले, ‘दरवर्षी आपण 100 कोटी कोंबड्या, गायी आणि डुकरांना मारतो. यासाठी पुरुषांना जबाबदार धरले पाहिजे.’

ते पुढे म्हणाले, ‘महिलांनी पुरुषांच्या विरोधात 'सेक्स स्ट्राइक' करावे. ही माणसे 40% हरितगृह वायू उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत. महिलांनी मांसाहारी पुरुषांसोबत सेक्स करू नये. सेक्स हे एक माध्यम म्हणून वापरले पाहिजे.’ PETA ने म्हटले आहे की, शहरी पुरुष हे एका हातात बिअर धरतात आणि त्यांच्या महागड्या गॅस स्टोव्हवर मांस शिजवतात. या मंडळींना वाटते की, ते मांस खाण्याच्या क्षमतेनेद्वारे जगासमोर आपले 'मर्दत्व' सिद्ध करत आहेत. मात्र हे लोक केवळ प्राण्यांचेच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीचे नुकसान करत आहेत. त्यामुळे अशा लोकांविरुद्ध महिलांनी सेक्स स्ट्राईक करायला हवा. (हेही वाचा: चार मुलांच्या आईने सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर खुलेआम केला सेक्स; नंतर स्वतःच सोशल मिडियावर शेअर केले XXX व्हिडिओ)

दरम्यान, सेक्स स्ट्राइक ही जगभरातील एक लोकप्रिय संकल्पना असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यात लाइबेरियाच्या लेमाह गोबी यांच्या 2003 च्या प्रसिद्ध प्रयत्नाचा समावेश आहे, ज्याने आपल्या देशातील क्रूर गृहयुद्ध संपवण्यासाठी महिलांना सेक्स स्ट्राइक मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले होते. स्त्रियांना त्यांच्या पतींशी लैंगिक संबंध ठेवण्यापासून रोखण्याची त्यांची रणनीती होती, जेणेकरून त्यांचे पती युद्ध संपवतील. लेमाह गोबी यांना त्यांच्या कामासाठी 2011 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे.