दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताच्या कोविड-19 लसीला (Covid-19 Vaccine) कोविशिल्डला (Covishield) मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता लवकरच सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) निर्मित 'कोविशिल्ड' लस दक्षिण आफ्रिकेकडून आयात करण्यात येईल. याची धोषणा दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री ज्वेलि मखाइज (Zweli Mkhize) यांनी शनिवारी केली. यापूर्वी भारताने आशियातील इतर देशांना लसीचा पुरवठा केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका जानेवारी अखेरपर्यंत कोविशिल्ड लसीचे दहा लाख डोस आणि फेब्रुवारीमध्ये 5 लाख डोस आयात करेल, असा अंदाज आहे. सध्या दक्षिण आफ्रिका कोविड-19 च्या दुसर्या लाटेचा सामना करत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने देखील तेथील चिंता वाढली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लसी देण्याचा निर्णय घेतला आहे. (पाकिस्तानला भारताकडून Covishield लस मिळेल अशी अपेक्षा पण 'या' कारणामुळे ती थेट मिळणार नाही)
आफ्रिकेतील देश मोरोक्कोला ही लस पाठवल्यानंतर रबाट येथील भारतीय दूतावासाने ट्विट केले की, "जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अॅस्ट्रॅजेनेका द्वारा विकसित कोविड-19 लस आणि भारत आणि मोरोक्को यांच्यातील उत्कृष्ट संबंधांमुळे भारताकडून आज लसीचा पहिला साठा मोरोक्को येथे पाठविण्यात आला." त्यानंतर दूतावासाने स्वत: च्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी म्हटले की ही लस प्रत्येकाला देणे परवडणारे आहे.
जगातील बहुतांश देशांप्रमाणे कोविड-19 लसीच्या स्टोरेजचा प्रश्न दक्षिण आफ्रिकेसमोरही उभा राहिला आहे. कॅनडाने प्रत्येक व्यक्तीमागे 5 लसी देण्याचा हिशोबाने लसीचा संग्रह केला आहे. इतर पश्चिमी देशांकडून देखील लस निर्माण करणाऱ्या देशांकडे लसीचे प्री-बुकींग सुरु झाले आहे. या अशा अॅडव्हान्स बुकींगमुळे गरीब देशांची चिंता वाढली आहे.
विशेष म्हणजे भारत इतर देशांनाही लसीचा पुरवठा करत आहे. दरम्यान, कोविड-19 संकटात भारताने केलेल्या सहकार्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.