Girl Kills Classmate: चौदा वर्षीय मुलीचा वर्गमित्रांवर गोळीबार; एक ठार, पाच जखमी
Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Russian School News: शाळेतील अल्पवयीन मुलीने वर्गमित्रांवर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू (Girl Kills Classmate) तर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना रशियातील ब्रायन्स्क (Bryansk) शहरात घडली. आरोपी असलेली मुलगी केवळ 14 वर्षे वयांची आहे. स्थानिक पोलिसांनी गुरुवारी (7 नोव्हेंबर) दिलेल्या माहितीनुसार, मुलगी शाळेत येताना शॉटगन घेऊन आली होती. जी तिने उत्साहाच्या भरात मित्रांना दाखविण्यासाठी उघडली असता त्यातून गोळी सुटली आणि बार निघाला.

मुलांच्या प्रकृतिबद्दल चिंता

शाळा प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना तातडीने दिली. पोलिसही माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी म्हणजेच शाळेत दाखल झाले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. त्याच्या प्रकृतीबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे, धोक्याबाहेर आहे की, चिंताजनक याबाबत कोणतीही माहिती पुढे येऊ शकली नाही. रशियन पोलिसांच्या तपास समितीने घटनेची नोंद घेतली आहे. तसेच, गोळीबाराचे कारण त्याचा हेतू याबाबत तपास सुरु केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तपासास अद्याप वेग आला नाही. मात्र, लवकरच प्रकरणातील हेतू आणि सत्य बाहेर येईल, असे समतीने म्हटले आहे.या घटनेस कारणीभूत असलेल्या कारण आणि घटनांचा क्रम समजून घेण्यावर पोलिसांनी सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. (हेही वाचा, Schoolboy Attack Classmate: शाळेतील भांडणातून वर्गमित्रावर हल्ला; इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलास कंपासने 108 वेळा भोसकले)

विद्यार्थिनीने दप्तरात आणली बाबांची शॉटगन

प्राथमिक चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसर, विद्यार्थ्यीनिने शाळेत पंप-अॅक्शन शॉटगन आणली होती. जी तिच्या वडिलांची असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलांच्या हाती लागेल अशा ठिकाणी शस्त्र ठेवल्याबद्दल पालकांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या प्रकरणानंतर जोर पकडू लागली आहे. दरम्यान,शाळेतील गोळीबाराने समाजाला धक्का बसला आहे. शाळेतील विद्यार्थी घाबरले आहेत. तर, पालकांच्या मनातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये शस्त्रांप्रती असलेले आकर्षण आणि हिंसा याबाबत चिंता व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Pune: मैत्रिणीशी बोलतो! शालेय विद्यार्थ्यावर अल्पवयीन मुलाचा कोयत्याने हल्ला)

भारतातही विद्यार्थ्यांमधील वाढती हिंसा चिंताजनक

लहान मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा चिंतेचे कारण ठरत आहे. अलिकडेच भारतातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील एका शाळेत किरकोळ कारणावरुन संतापलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने आपल्याच वर्गातील मुलावर दप्तरातील कंपासने भोसकले. विद्यार्थी इतके बेभान झाले होते की, त्यांनी पीडित मुलाला एकदोन नव्हे तर तब्बल 108 वेळा भोसकले. ज्यामुळे पीडित विद्यार्थी प्रचंड जखमी झाला. दुसऱ्या एका घटनेत शाळेतीलच विद्यार्थ्यांनी 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.