Afghanistan: अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबानी कारवायांमुळे 10 हजार नागरिक विस्तापीत
Afghanistan

अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य परत जाताच तालिबानी (Taliban) सेनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अफगाणिस्तानमध्ये घातपाती कारवाया वाढल्या आहेत. वृत्तसंस्था AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातील कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kandahar Airport) रॉकेट (Rockets ) लॉन्चर्सनी हल्ला झाला आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी कंधार शहराला चारी बाजूंनी घेरले आहे. सध्या अफगाणिस्तान (Afghanistan) लष्कराचे जवान आणि तालिबानी दहशतवादी यांच्यात युद्ध सुरु आहे. विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री जवळपास तीन रॉकेट दक्षिणी अफगाणिस्तान येथील कंधार विमानतळावर आदळली.

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील मोठ्या भूभागावर कब्जा केला आहे. हा कब्जा वाढविण्यासाठी ते दररोज प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दहशतवादी कारवायाही करत आहेत. देशातील अधिकमोठ्या भागांमध्ये दहशतवादी आणि अफगानी लष्कर यांच्यात युदध सुरु आहे.कंधार एअरपोर्टचे प्रमुख पश्तून यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, काल रात्रीतीन रॉकेट डागण्यात आले. ते कंधार विमानतळाच्या धावपट्टीवर आदळले. त्यामुळे विमानतळावरील सर्व उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून परत गेल्यांतर काही काळातच तालिबानने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

एएनआय ट्विट

कंधार येथील एका खासदाराने सांगितले की, अफगानिस्तान तालिबानच्या हातात जाण्याचा धोका आहे. इथे तालिबानचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर घुसले आहेत. तसेच, लष्करासोबत त्यांचे युद्ध मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आतापर्यंत युद्धाच्या कारणावरुन सुमारे 10 हजार लोक विस्थापीत झाले आहेत. हे लोक इराण, पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये जाऊन त्यांनी शरणागती पत्करली आहे. दरम्यान, तालिबान कंधारवर हल्ला करु इच्छितो आहे त्यामागे असेही एक कारण आहे, जेणेकरुन तालिबानला ही कायमची राजधानी करता येऊ शकेल. तालिबानचा जन्मही कंधारमध्येच झाला होता.