Porn Videos in Train: ट्रेनमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहणे पडू शकते महागात; होणार कडक कारवाई, 'या' रेल्वे कंपनीने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

ट्रेनने प्रवास करणे आरामदायक, किफायतशीर आणि अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे महिन्याला लाखो लोक ट्रेनने प्रवास करत असतात. परंतु ट्रेन ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि या सार्वजनिक मालमत्तेचा वापर करताना सरकारने जारी केलेल्या काही महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. आता युकेच्या (UK) रेल्वे फर्मने काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यानुसार जर एखादी व्यक्ती ट्रेनमध्ये अश्लील व्हिडिओ किंवा पॉर्न व्हिडिओ (Porn Video) पाहताना पकडली गेली, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

याशिवाय ट्रेनमध्ये ज्वलनशील, प्रक्षोभक विषयांवर बोलणेही बंद करावे लागेल. अशा मुद्द्यांमुळे लोकांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींना ट्रेनमध्ये प्रवास करताना मनाई केली जाईल. नॉर्दर्न रेल नावाच्या ब्रिटिश रेल्वे कंपनीने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ब्रिटनची नॉर्दर्न रेल्वे (Northern Railway) कंपनी फ्रेंडली वायफायच्या सहकार्याने ट्रेनमध्ये इंटरनेट पुरवते. आता कंपनीने आपल्या अखत्यारीत येणारी स्थानके आणि ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सांगितले आहे की, जर कोणी ट्रेनमध्ये अश्लील व्हिडिओ पाहताना आढळले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय प्रवासादरम्यान प्रक्षोभक, दाहक गोष्टींनाही आळा घालावा लागेल. अशी कोणतीही सामग्री टाळली पाहिजे ज्यामुळे इतरांना अस्वस्थ वाटू शकेल किंवा त्रास होईल.

कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ट्रिसिया विल्यम्स यांनी सांगितले की, काही लोक रेल्वे प्रवासादरम्यान अशा गोष्टी शोधतात, पाहतात, वाचतात ज्या इतरांनी ऐकण्या आणि पाहण्यासारख्या नसतात. अशा सर्व सामग्रीवर आता ट्रेनमध्ये बंदी घालण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, 4 एप्रिल रोजी उत्तर रेल्वेमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तनाची घटना समोर आली होती, त्यानंतर रेल्वेने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (हेही वाचा: Sexual Abuse: मुलांना बोलवायचे, आमिष दाखवायचे आणि नंतर संबंध बनवायचे; 6 महिला शिक्षक अटकेत)

ही महिला 4 एप्रिल रोजी उत्तर रेल्वेने प्रवास करत होती. यादरम्यान एका व्यक्तीने महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केले. महिलेने नकार देऊनही त्याने व्यक्तीने तिचे फोटो काढले. अखेर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर सह प्रवाशांनी याला विरोध केल्यावर, तो बदमाश पसार झाला.