धक्कादायक! 5.62 लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरी; CBI कडून Cambridge Analytica आणि Global Science Research Limited विरोधात गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने यूके कंपनी केंब्रिज अॅनालिटिका (Cambridge Analytica) आणि ग्लोबल सायन्स रिसर्च लिमिटेडविरूद्ध (Global Science Research Limited) भारतीय फेसबुक वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरी केल्याचा आरोप लावला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. ग्लोबल सायन्स रिसर्चने एक अॅप (thisisyourdigitallife) तयार केले होते. जे फेसबुकने 2014 मध्ये त्याच्या वापरकर्त्यांकडून संशोधन व शैक्षणिक उद्देश्यांसाठी विशिष्ट डेटा गोळा करण्यासाठी अधिकृत केले होते. (वाचा - Facebook ला जबर फटका, डेटा लीक प्रकरणी भरावा लागणार 5 अब्ज डॉलर्सचा भुर्दंड)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यानंतर कंपनीने केंब्रिज अॅनालिटिकावर गुन्हेगारी कट रचला आणि डेटा व्यावसायिक वापरासाठी वापरण्यास मान्यता दिली. 2016-17 मध्ये फेसबुकने दोन्ही कंपन्यांकडून अ‍ॅपचा वापर करून गोळा केलेला डेटा जतन करुन नष्ट केल्याची दाखले गोळा केले. परंतु, सीबीआय चौकशीतील अधिकाऱ्यांच्या महणण्यानुसार, असा कोणताही डेटा नष्ट केल्याचा पुरावा मिळालेला नाही. (वाचा - अमेरिकेचे नवे अध्यक्ष Joe Biden अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहिल्याच दिवशी Donald Trump यांचे निर्णय मोडीत काढून घेतले काही महत्वाचे निर्णय)

एफआयआरचा हवाला देत एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात यूकेच्या ग्लोबल सायन्स रिसर्च लिमिटेडने अॅप वापरकर्ते आणि फेसबुक फ्रेंडसच्या डेटाचा बेकायदेशीरपणे व फसव्या पद्धतीने वापर केला. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 2018 मध्ये सांगितलं की, ब्रिटीश कंपनीने 2014 च्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये फेरफार करण्यासाठी कायद्यांचे उल्लंघन केले की नाही, याचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणा करेल. यापूर्वी तपास यंत्रणेने केंब्रिज अॅनालिटिका आणि फेसबुकने शेअर केलेल्या तपशीलांची तपासणी केली आहे.

केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार, जुलै 2018 मध्ये त्याच्या प्राथमिक तपासणीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च लिमिटेडविरूद्ध 5.62 लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी केंब्रिज अॅनालिटिकावर डोनाल्ड ट्रम्प यांना 2016 च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जिंकायला मदत करण्यासाठी 87 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती वापरल्याचा आरोप करण्यात आला होता.