Oman Travel Ban: ओमान कडून भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशासह 24 देशामधून येणाऱ्या प्रवाशांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. ही बंदी अनिश्चित काळासाठी घातली गेली असून कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमानच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन घोषणा करण्यात आली आहे की, पुढील नोटीस पर्यंत फ्लाइट्सवर बंदी घातली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेतला आहे.(दिलासादायक! Pfizer आणि Moderna च्या कोविड-19 विरोधी लसीमुळे संसर्ग होण्याचा धोका 91 टक्क्यांपर्यंत कमी- Study)
ओमानने अन्य देश जसे ब्रिटेन, ट्यूनीशिया, लेबनान, ईरान, इराक, लीबिया, ब्रुनेई, सिंगापुर, इंडोनेशिया, फिलीपींस, इथियोपिया, सूडान, तंजानिया, दक्षिण अफ्रीका, घाना, सिएरा लियोन, नाइजीरिया, गुएना, कोलंबिया, अर्जेंटीना आणि ब्राजील देशावर बंदी घातली आहे. यामधील काही देशांमधून येणाऱ्यांवर 24 एप्रिल पासूनच बंदी घातली गेली आहे. ओमानमध्ये बुधवारी कोरोना व्हायरसचे 1675 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर देशातील एकूण संक्रमणाचा आकडा 2,80,253 झाला आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3356 जणांचा बळी गेला आहे.(LA International Airport: बाबो! पठ्ठ्याने चक्क चालत्या विमानातून मारली उडी; जाणून घ्या काय घडले पुढे)
तर 27 जूनला संयुक्त अरब अमीरात (UAE) ने घोषणा केली होती की, भारतासह 14 देशांवर प्रवासाठी बंदी असणार आहे. देशाच्या एविएशन अथॉरिटीने म्हटले होते की, बिझनेस आणि चार्टर फ्लाइट्ससाठी ही बंदी नसणार आहे. UAE चे जनरल सिव्हिल एविएशन अथॉरिटी यांनी म्हटले की, भारत, पाकिस्तान, लाइबेरिया, नामीबिया, सिएरा लियोन, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा, जाम्बिया, विएतनाम, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, नाइजेरिया आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाट्सवर कोरोना व्हायरसच्या कारणामुळे बंद केली आहेत. UAE कडून भरतात सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान 24 एप्रिलालच फ्लाइट्सवर बंदी घातली गेली.