Photo Credit- X

Canadian PM Justin Trudeau on Khalistanis: कॅनडामध्ये खलिस्तानी कट्टरपंथी उपस्थित असून त्यांच्याकडून भारतीय नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भारताकडून अनेकदा करण्यात आला. मात्र कॅनडाकडून हा दावा नेहमीच फेटाळून लावला गेला. त्यानंतर आता पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी कॅनडाच्या भूमीत खलिस्तान्यांचा वावर असल्याचे कबूल (Khalistani supporters in Canada)केले आहे. 'कॅनडामध्ये खलिस्तानी आहेत, पण ते सर्व शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तसेच कॅनडात पंतप्रधान मोदींचेही हिंदू समर्थक आहेत, पण ते सर्व हिंदू मोदी समर्थक नाहीत', असे पंतप्रधान ट्रुडो म्हणाले.

खलिस्तान्यांचे अनेक समर्थक कॅनडात आहेत. पण ते सर्व शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तसेच कॅनडात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही समर्थक आहेत, तेही सर्व जण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात तणाव निर्माण झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांचे विधान महत्त्वाचे मानले जाते. सप्टेंबर 2023 मध्ये हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तहेरांचा सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे संबंध निर्माण होत गेले. (हेही वाचा: इलॉन मस्कची ट्रान्सजेंडर मुलगी व्हिव्हियन जेना विल्सन हिने 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पच्या विजयानंतर यूएस सोडण्याची योजना आखली)

भारताने निज्जरला दहशतवादी घोषित करून त्याच्या अटकेची मागणी केली होती. 18 जून 2023 रोजी ब्रिटिश कोलंबिया येथील एका गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती. मागच्या महिन्यात कॅनडाने निज्जरच्या हत्येची चौकशी करत असताना भारतीय उच्चायुक्तांवर ठपका ठेवला. उच्चायुक्तांना निज्जरच्या हत्येत रस होता, असा आरोप कॅनडाने केल्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केली. तसेच आपले सर्व राजनैतिक अधिकारी कॅनडातून माघारी बोलविण्यात आले. तसेच कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देशाबाहेर काढण्यात आले.