Nirav Modi (Photo Credits: Twitter)

Nirav Modi Extradition Case: पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याचिका लंडन मधील कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच कोर्टाने त्याच्या भारतातील प्रत्यार्पणासाठी मंजूरी दिली गेली असल्याने त्याला आता लवकरत भारतात आणण्यात येणार आहे. वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायाधीश सॅम्युअल गोजी यांनी असे म्हटले, हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की नीरव मोदी याला भारतात काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. त्याचसोबत कोर्टाने नीरव मोदी याची मानसिक प्रकृती स्थिर नसल्याची याचिका सुद्धा फेटाळली आहे.

कोर्टाने पुढे असे ही म्हटले की, साक्षीदारांना धमकावण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. तर आता ब्रिटेन मधील वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातील नीरव मोदीच्या प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. अशी अपेक्षा आहे की, 13 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी त्याला भारतात पाठवले जाऊ शकते. कोर्टाने त्याला भारतात पाठवण्यासाठी गेल्या महिन्यातील सुनावणी दरम्यान 25 फेब्रुवारीची तारीख निवडली होती.(Nirav Modi Extradition Case: नीरव मोदी याचे चांगले दिवस संपले?)

Tweet:

गेल्या महिन्यात भारतीय तपास यंत्रणेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्विस (CPS) ने ब्रिटेनच्या कोर्टाला असे सांगितले की, नीरव मोदी मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूकीसाठी जबाबदार आहे. याच कारणामुळे पीएनबी बँकेला नीरव मोदी याने चुना लावला.(Nirav Modi Assets Confiscated: नीरव मोदी याची 326.99 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; मुंबई, अलीबागसह जैसलमेर येथील पवन चक्की, लंडन येथील फ्लॅटचाही समावेश)

क्राउन प्रॉसिक्युशन सर्विस (CPC) ने कोर्टाला म्हटले की, नीरव मोदी याने बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून कट रचत आपल्या तीन कंपन्यांचा वापर करत घोटाळा केला. त्याचसोबत नीरव मोदी याने साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे ही कोर्टासमोर सांगण्यात आले.