Nirav Modi Assets Confiscated: नीरव मोदी याची 326.99 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; मुंबई, अलीबागसह जैसलमेर येथील पवन चक्की, लंडन येथील फ्लॅटचाही समावेश
Nirav Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारताबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तब्बल 326.99 कोटी रुपयांची ही संपत्ती असल्याचे समजते. अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये (Fugitive Economic Offenders Act) ही कारवाई केली. जप्त केलेल्या संपत्तीत लंडन, यूएईमधील फ्लॅट्सचाही समावेश असल्याची माहिती आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी हा मुख्य आरोपी आहे. पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) गेले प्रदीर्घ काळ त्याच्या मागावर आहे. नीरव मोदी याला भारतात आणण्यात सरकारला अद्याप यश आले नाही. मात्र, त्याची देश-विदेशातील संपत्ती जप्त करुन अंमलबजावणी संचालनालयाने त्याला चांगलाच दणका दिला आहे.

नीरव मोदी याच्या संपत्तीवरील कारवाई बाबत बोलताना अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले की, जप्त केलेल्या संपत्तीत प्रामुख्याने मुंबई येथील वरळी परिसरातील प्रसिद्ध अशी समुद्र महल इमारीतील 4 फ्लॅट्स, अलीबाग येथील जमीन आणि समुद्र किनाऱ्यावरील एक फार्म हाऊस, जैसलमेर येथील एक पवन चक्की, लंडन येथील एक फ्लॅट, संयुक्त अरब अमीरात (UAE) येथील निवासी घर, शेअर आणि बँकांमध्ये जप्त असलेली गुंतवणूक अशा संपत्तीचा समावेश आहे.

भारतात कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून घोटाळा करणाऱ्या आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आरोपी असलेला नीरव मोदी मार्च 2019 पासून लंडन येथील कारागृहात कैद आहे. गेल्या महिन्यात लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाने नीरव मोदी याला 9 जुलै पर्यंत आणि न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. (हेही वाचा, फरार आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग येथील बंगला पाडला)

नीरव मोदी याला अटक केल्यापासून तो वैंडसवर्थ येथील कारागृहात आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) सोबत 2 अब्ज डॉलर इतक्या रकमेची फसवणूक केल्या प्रकरणी नीरव मोदी याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याच्या प्रत्यार्पणाबाबत इंग्लंड आणि भारत सरकार यांच्यात चर्चा सुरु आहे. त्यासंबंधीचा एक खटलाही इंग्लंडच्या कोर्टात सुरु आहे. नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाबाबत न्यायालयात येत्या 7 सप्टेंबरला सुनावणी होणार आह