New Deadly COVID-19-Like Virus: चीन करत आहे नवीन प्राणघातक COVID-19 सारख्या विषाणूचा प्रयोग; उंदरांसाठी ठरला 100 टक्के घातक- Reports
Virus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

New Deadly COVID-19-Like Virus: कोरोनासारख्या (Covid-19) धोकादायक आजाराने 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये जगभर थैमान घातले होते. यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. संपूर्ण जगाने कोरोना रोगासाठी चीनला (China) जबाबदार धरले होते, कारण या विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान लॅबमधून झाली होती. अजूनही जग या धोकादायक महामारीमधून पूर्णतः बाहेर पडले नाही, अशात चीनमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहवालानुसार, पुन्हा एकदा चीन संपूर्ण जगाला कोरोनासारख्या महामारीच्या विळख्यात अडकवू शकतो.

बायोआरक्सिव वेबसाइटवर 3 जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका पेपरनुसार, चीन नवीन प्राणघातक कोविड सारख्या विषाणूवर प्रयोग करत आहे. महत्वाचे म्हणजे, हा विषाणू उंदरांसाठी 100 टक्के घातक ठरला आहे आणि या विषाणूचा मानवावरही परिणाम होण्याची भीती आहे. हा दावा प्री-पीअर रिव्ह्यू केलेल्या जर्नलमध्ये करण्यात आला आहे. चिनी लष्कराच्या प्रशिक्षित डॉक्टरांनी तथाकथित पॅंगोलिन कोरोना व्हायरस (Pangolin Coronavirus) नावाचा नवीन प्रकार तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चिनी सैन्याच्या प्रशिक्षित डॉक्टरांच्या पथकाने उंदरांच्या गटावर या पॅंगोलिन कोरोनाव्हायरस प्रकाराचा प्रयोग केला. पॅंगोलिन कोरोनाव्हायरसचा उंदरांवर कसा परिणाम होतो हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतर, गटातील चार उंदरांना सक्रिय विषाणूचा डोस देण्यात आला आणि उर्वरित 4 चांगले उंदीर संक्रमित उंदरांसोबत ठेवण्यात आले. या प्रयगोमध्ये त्यांना आढळून आले की 7-8 दिवसांत, निरोगी उंदीर संक्रमित उंदरांच्या संपर्कात आल्यानंतर संसर्गाचे बळी ठरले. (हेही वाचा: Prediabetes in Teen Girls: ग्रामीण महाराष्ट्रातील जवळपास 39% किशोरवयीन मुली आढळल्या प्री-डायबेटिक; मधुमेहाच्या अभ्यासामधून समोर आली धक्कादायक बाब)

त्यानंतर, डॉक्टरांना असे आढळून आले की, पूर्णपणे संक्रमित झाल्यानंतर, पाच दिवसांत सर्व उंदरांचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले. त्याचे डोळे पांढरे झाले आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. चीनने उंदरांवर केलेल्या प्राणघातक प्रयोगांचे परिणाम मानवांसाठीही धोकादायक ठरतील अशी भीती आहे. हा विषाणू संक्रमित उंदरांच्या फुफ्फुसात पसरला. यानंतर व्हायरसने त्याच्या मेंदूवरही हल्ला केला. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा विषाणू केवळ उंदरांच्या शरीरातच पसरला नाही, तर मेंदू, डोळे आणि फुफ्फुस यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंतही पोहोचला. माहितीनुसार, पॅंगोलिनचा SARS-CoV-2 शी संबंध असल्याचे दाखवणारा हा पहिला अहवाल आहे.