₹ 2000 , ₹ 500 नंतर आता 200 रुपयांच्या नोटांवरही बंदी, सरकारी निर्णयाची मंत्री गोकुल बास्कोटा यांनी दिली माहती
Indian currency Rs 200 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Indian Notes Ban In Nepal: नेपाळ सरकारने भारतीय चलनातील नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय अद्यापही कायम ठेवला आहे. नेपाळ सरकारने सुरुवातीला दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता भारतीय चलनाच्या दोनशे रुपयांच्या नोटांवरही नेपाळ सरकारने बंदी घातली आहे.

नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री गोकुल बास्कोटा यांनी काठमांडू येथे आयोजित मंत्रीपरिषदेत सांगितले की, भारतीय चलनाच्या दोनशे रुपयांच्या नोटेवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ सरकारच्या या घोषणेनंतर आता दोन हजार, पाच शे आणि दोन शे रुपयांच्या नोटा कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी संस्था, व्यापारीस संस्था आदींमध्ये मान्यताप्राप्त असणार नाहीत.

गेल्या काही काळात पाकिस्तानमधे भारतीय चलनाच्या नकली नोटा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पकडण्यात आल्या आहेत. तसेच, या नोटा सापडण्याचे प्रमाणही मोठे आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांकडे या नोटा खऱ्या की खोट्या हे ओळखण्याचे कोणतेही साधन अथवा मार्ग नाही. त्यामुळे या नोटा ओळखायच्या कशा याबाबत नागरिकांसमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. (हेही वाचा, 500 रुपयांच्या नोटांचे पडतायत तुकडे, सांगली जिल्ह्यातील विटा येथील प्रकार)

दरम्यान, नकली नोटा आणि असली नोटा सर्वसामान्य नागरिकांना ओळखता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर मंत्री गोकुल बास्कोटा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, नेपाळमध्ये भारतीय चलनाच्या अनेक बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर सापडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरुन सरकारने हा निर्णय घेतला आहे.