InSight च्या मदतीने नासाचं मंगळ ग्रहावर यशस्वी लॅन्डिंग Photo credit: Twitter

NASA's Mars InSight Mission: मंगळ ग्रहावर  InSight या रोबोटच्या माध्यमातून उतरण्याचा नासाचा (NASA ) प्रयत्न सफल ठरला आहे. भारतीय वेळेनुसार(27 नोव्हेंबर ) रात्री   1.23 मिनिटांनी नासाचा रोबोट मंगळावर उतरला. या यशस्वी प्रयत्नानंतर नासा स्पेस सेंटरमध्ये आनंदाचं आणि जल्लोषाच वातावरण होते.  एलिसियम प्लानिशिया या सपाट मैदानावर लॅन्डिंग करण्यात आलेले आहे. मंगळ ग्रहाच्या भूमध्य रेषेजवळ लॅन्डिंग झाले आहे.

सात महिन्यांपूर्वी नासा स्पेस (NASA )सेंटरकडून InSight  हे मंगळ ग्रहाकडे झेपावलं होतं. मंगळावर उतरण्यापूर्वीच 7 मिनिटं अत्यंत महत्त्वाची होती. यावेळेत वेगावर नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. मात्र नासाची मंगळावर यशस्वी लॅन्डिंग करण्याची मोहिम फत्ते झाली आहे. या प्रकल्पासाठी नासाने 993 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती.

जगभरातील विविध स्पेस एजन्सींनी मंगळावर उतरण्यासाठी 43 विविध प्रयत्न केले आहेत. मात्र ते अयशस्वी ठरले. या InSight चे मंगळावरील प्रयोग यशस्वी ठरले तर 2030 पर्यंत मंगळावर मनुष्याला पाऊल ठेवणंदेखील शक्य होणार आहे.

च्या मदतीने मंगळावरील वातावरणाचा प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे. तेथील धूळ,हवा यांचा अंदाज घेतला जाईल. सोबतच भुकंप, कंपन यांचा अभ्यास करण्याकडे नासाच्या (NASA ) इंजिनियर्सचं लक्ष लागून राहिले आहे.