Corona Virus: कोरोनामुळे लहान मुलं संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले, तब्बल 'इतक्या' मुलांना झाली कोरोनाची लागण
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोनाचा (Corona Virus) पार्दुभाव संपुर्ण जगावर झाला आहे. यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारताप्रमाणेच (India) अमेरिकेतही (America) याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे. सगळीकडे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) सुरू आहे. मात्र ही लस अजून लहान मुलांना देण्यात आली नाही आहे. यामुळे आता कोरोनाचा धोका लहान मुलांना अधिक वाढला आहे. अनेक लहान मुलं कोरोना संक्रमित होत आहेत. याची सर्वात जास्त आकडेवारी (Corona Statistics) अमेरिकेत आहे. अमेरिकेतील एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की. अमेरिकेत आतापर्यंत 40 दशलक्षाहूनही अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे. अमेरिकन अँकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (American Academy of Pediatrics) आणि चिल्ड्रेन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या (Children's Hospital Association) ताज्या अहवालानुसार अमेरिकेत 40 दशलक्षाहूनही अधिक मुलांनी कोरोना व्हायरससाठी सकारात्मक चाचणी केली आहे. या अहवालानुसार 15 जुलैपर्यंत कोविडमध्ये सुमारे 40 लाख मुलांना संसर्ग झाला आहे. गेल्या काही महिन्यांत नोंदवलेल्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर जुलैमध्ये देशात प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे.

या अहवालानुसार एका आठवड्यात 23,500 हून अधिक बालके संक्रमित आढळून आली आहेत. अमेरिकेतील कोविडच्या प्रकरणांमध्ये मुलांची संक्रमित होण्याचे प्रमाम 14.2 टक्के आहे. अहवालात असे म्हटले आहे की एकूण रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांमध्ये 1.03 टक्के ते 6.6 टक्के कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण 0.26 टक्के आहे.

मात्र अद्यापही असे दिसते आहे की मुलांमध्ये कोविडमुळे गंभीर आजार दुर्मीळ आहेत. मुलांवर दीर्घकाळापर्यंत होणाऱ्या दुष्परिणामांविषयी अधिक माहिती संकलित करण्याची आवश्यकता आहे. ज्यात विषाणूमुळे संक्रमित मुलांच्या दीर्घकालीन शारीरिक आरोग्यास तसेच त्याच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यास किती हानी पोहोचू शकते. हे लक्षात येईल.

 कोरोना विषाणूमुळे लाखो मुल अनाथ झाले आहेत. साथीच्या पहिल्या 14 महिन्यांत जगातील 21 देशांतील 15.62 लाख मुलांनी आई किंवा वडील किंवा दोघेही गमावले आहेत. यापैकी 1,16,263 मुले ही भारतातील आहेत. अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या (American National Institutes of Health) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अ‍ॅब्युजच्या (National Institute on Drug Abuse) अहवालानुसार, भारतातील 25,500 मुलांनी आपली आई, 90,751 वडील गमावले आहेत. तर कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 12 मुलांनी दोन्ही पालकांना गमावले आहे. यावर उपाय म्हणजे सरकारने लवकरात लवकर लसीकरण सुरू करावे.