
अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आल्यापासून इमिग्रेशन पॉलिसी मध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहे. सध्या अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या नागरिकांना परत पाठावलं जात असताना आता अनेकांना या बदलत्या व्हिसा आणि इमिग्रेशन पॉलिसीवरून त्यांच्या भविष्याची चिंता लागली आहे. सध्या यामध्ये self-deportation ची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. self-deportation मध्ये H-4 visas वर अल्पवयीन म्हणून अमेरिकेत दाखल झालेल्या आणि आता 21 वर्षांच्या जवळ येत असताना अनिश्चित भविष्याचा सामना करणाऱ्या हजारो भारतीय स्थलांतरितांना याचा फटका बसत आहे.
सध्याच्या अमेरिकन इमिग्रेशन कायद्यांनुसार, 21 वर्षांचे झाल्यानंतर, हे स्थलांतरित त्यांच्या H1B व्हिसा धारक पालकांचे अवलंबित म्हणून पात्र राहणार नाहीत. "aging out" चा धोका आणि दुसऱ्या व्हिसा दर्जावर जाण्याच्या गुंतागुंतीमुळे, अनेकांकडे कोणतेही व्यवहार्य पर्याय उरलेले नाहीत.
Self-deportation म्हणजे काय?
Self-deportation म्हणजे हद्दपारीच्या भीतीमुळे किंवा कायदेशीर दर्जा मिळविणं शक्य नसल्याने स्थलांतरितांनी देश सोडण्याचा स्वेच्छेने घेतलेला निर्णय. हा निर्णय बहुतेकदा तेव्हा येतो जेव्हा व्यक्तींना असे वाटते की कायदेशीररित्या देशात राहण्याची त्यांची शक्यता अंधुक आहे, ज्यामुळे ते इतरत्र संधी शोधायला सुरूवात करतात.
कॅनडा आणि यूके सारख्या देशांमध्ये अधिक अनुकूल इमिग्रेशन धोरणं असल्याने, अनेक तरुण भारतीय स्थलांतरितांसाठी self-deportation करत आहेत. US Gold Card: आता 50 लाख डॉलर्समध्ये खरेदी करू शकता अमेरिकेचे नागरिकत्व; Donald Trump यांनी जाहीर केली 'गोल्ड कार्ड' योजना, जाणून घ्या सविस्तर .
अमेरिकेत सध्या सुमारे 1.34 लाख dependent Indian immigrants, या वर्षी 21 वर्षे पूर्ण करणार आहेत पण आयुष्याचा हा टप्प्या ही परिस्थिती पाहता त्यांच्यासाठी आनंद साजरा करणारा नसेल. त्यांना नाईलाजास्तव अमेरिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.
अमेरिकेत राहण्यासाठी पर्याय काय?
काहींना, F-1 विद्यार्थी व्हिसावर जाऊन अमेरिकेत राहता येऊ शकते, परंतु त्यातही मोठी आव्हानं आहेत. F-1 व्हिसा मिळवणारे H-4 व्हिसा धारक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून ओळखले जातील. याचा अर्थ ते राज्यातील शिक्षण शुल्क, संघीय आर्थिक मदत आणि काही विशिष्ट शिष्यवृत्तींपासून वंचित राहणार.