Hindu Temple Destroyed in Pakistan | (Photo Credits: Twitter)

भारताचा शेजारी पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वाह (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील कारक जिल्ह्यातील एका ठिकाणी ऐतिहासिक हिंदू मंदिरावर हल्ला (Attack on Hindu Temple in Pakistan) झाला आहे. या हल्ला प्रकरणात पाकिस्तान पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपांना ताब्यात घेण्यासाठी तपास सुरु आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू मंदिरावर (Hindu Temple in Pakistan) करण्यात आलेल्या हल्ल्याचा मानवाधिकार कार्यकर्त्यांनी निशेध गेला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉन ने याबाबत वृत्त दिले आहे.

द डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत पोलिसांनी छापा टाकून 14 आरोपींना अटक करण्यात केली आहे. अटक झालेल्या 14 जणांवर बेकायदेशीररित्या जमाव जमवणे आणि जमावाला हिंसक कृत्य करण्यासाठी उसकावने, प्रवृत्त करणे असे आरोप आहेत. या प्रकरणात आणखीही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस तपास करत आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काही मौलानांच्या उपस्थितीत जमावाने मंदिराला आग लावली. एक मौलाना आणि एका राजकीय पक्षाचा नेता मंदिराला आग लावण्यासाठी जमावाला उसकावत असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Imran Khan on Pakistan Army: पाकिस्तानी लष्कर दबावात- इमरान खान)

मंदिराचा जिर्नोद्दार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर या मंदिराचे काम सुरु होते. मात्र या दरम्यान, जमावाने मंदिरावर हल्ला केला आणि मंदिराची तोडफोड करुन ते जमीनदोस्त केले. मौलानाओंच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथे नवे हिंदू मंदिर उभारण्यास परवानगी दिली होती. इस्लामाबादमध्ये हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले गेल्या काही काळात वाढले आहेत.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मंदिराचे छत आणि भींती कोसळताना दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर बहुसंख्याक असलेल्या मस्लिम समाजाकडून होत असलेल्या हल्ल्यांचा मानवाधिकार संघटनांनी तीव्र निशेध केला आहे.