Imran Khan on Pakistan Army: पाकिस्तानी लष्कर दबावात- इमरान खान
Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान कबूल केले आहे की, पाकिस्तानी लष्कर दबावात (Pakistani Army In Under Pressure) आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार केव्हाही उलथवून टाकले जाऊ शकते. इमरान खान यांनी विरोधी पक्षनेत्यांवर आरोप केला आहे की, ते भारतीय शक्तींसोबत हातमिळवणी करुन विद्यमान सरकार उलथवून टाकण्यासाठी लष्कराला (Pakistani Army ) ब्लॅकमेल करत आहे. सध्यास्थितीत जनरल बाजवा हे हा दबाव सहन करत आहे. परंतू, हे अधिक काळ सहन केले जाऊ शकत नाही.

पाकिस्तानी वृत्तवाहीनी समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तानमधील विरोधी पक्ष हा पूर्णपणे बाहेरील शक्तीच्या तालावर नाचतो आहे. विरोधातील महागठबंधन पाकिस्तान टेमॅक्रेटीक मुव्हमेंट (पीडीएम) आणि इमरान खान यांच्यात सुरु असलेला संघर्ष अद्यापही थांबण्याची चिन्हे नाहीत. इमरान खान यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्ष लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआ प्रमुख जनरल फैज यांना निशाणा बनवत आहेत. ज्यााच प्रमुख उद्देश आहे की, लष्करावर दबाव टाकने जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकाला हटविले जावे. विरोधी पक्षनेता ज्या प्रतिक्रिया देत आहे त्यावर गद्दारीचा खटला चालू शकतो. तसे यावर लष्करी कादयानुसार कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. (हेही वाचा, Pakistan Debt: कर्जात बुडालेल्या पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन; सौदी अरेबियाचे Loan फेडण्यासाठी दिले तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज- Report)

इमरान खान यांनी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांचे कौतुक करत म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्यांनी लष्कर प्रमुखांवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे लष्करात प्रचंड राग आहे. जनरल बाजवा हे प्रचंड अनुभवी आहेत. त्यांच्यात संयम आहे. जर कोणी दुसरा व्यक्ती लष्करप्रमुख असता तर त्यांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र असती. तसेच, पाकिस्तानी लष्कर हे जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखाली काम करते. त्यांच्या कामाचेही इमरान खान यांनी कौतुक केले.

इमरान खान यांनी नावाज शरीफ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत म्हटले की, त्यांना पाकिस्तानात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतू, ते नेमके केव्हा पाकिस्तानात येतील याबाबत आताच काही सांगता येऊ शकत नाही, असेही इमरान खान म्हणाले.