Mehul Choksi

इंटरपोलने (Interpol) पंजाब नॅशनल बँक (PNB) प्रकरणातील फरारी आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीविरोधात (Mehul Choksi) जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली आहे. त्यामुळे मेहुल चोक्सी यांना भारतात यांना भारतात आणण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. नोटीस मागे घेतल्याने चोक्सीला जगभर मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळा करणारा निरव मोदी हा मेहुल चोक्सीचा पुतण्या आहे. चोक्सी व नीरव मोदी (Nirav Modi) यांनी पंजाब नॅशनल बँकेला 13500 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात गंडा घातला होता. यानंतर मेहुल चोक्सी जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळाला होता.तसेच 2019 मध्ये त्यांने सीबीआयने आपल्यावर लावण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची याचिका देखील केली होती. मात्र कोर्टाकडून ही याचिका फेटाळून लावली होती.  (Delhi Excise Policy Case: मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ, सुनावणीला ऑनलाईन हजेरीसाठी विनंती अर्ज करण्याची परवानगी)

मेहुल चोक्सीने नुकतीच अँटिग्वा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणात भारत सरकारला प्रतिवादी बनवले होते. याचिकेत म्हटले आहे की, दोन भारतीय एजंट, संभाव्यत: रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (R&AW) एजंट्सनी, त्याचे अँटिग्वा येथून अपहरण केले आणि जून 2021 मध्ये त्याला जबरदस्तीने डॉमिनिका रिपब्लिकामध्ये नेले होते.

2018 मध्ये, भारताने अँटिग्वाला चोक्सीचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली, जो त्याच वर्षी अँटिग्वाचा नागरिक बनला होता. चोक्सी हा आता भारतीय नागरिक नसला तरी अधिकाऱ्यांनी अद्याप त्याचा भारतीय पासपोर्ट रद्द केलेला नाही.