
अमेरिकेत कैलिफोर्निया येथील सेंटा क्रूज या भागांत मराठी व्यावसायिक तुषार अत्रे यांचा मृतदेह सापडला आहे. 24 सप्टेंबर रोजी तुषार यांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते व तब्बल आठवडाभराने त्याचा मृतदेह त्यांच्याच बीएमडब्लू गाडीत सापडला आहे.
50 वर्षीय तुषार हे एक आयटी व्यावसायिक होते व सिलीकॉन व्हॅलीमध्ये अत्रेटेक या नावाने त्यांची एक डिजिटल मार्केटिंग कंपनी होती व ते कोट्याधीश संपत्तीचे मालक होते.
तुषार यांच्या हत्येमध्ये कोणाचा हात असल्याचे अजूनही निश्चित झाले नसले तरी दरोडा घालण्याच्या हेतूने हे अपहरण करण्यात आल्याची संशव वर्तवण्यात येत आहे.