Mahatma Gandhi | (Photo Credits: ANI)

नूयॉर्क शहरात (New York City) महात्मा गांधी (Mahatma Gandhi ) यांच्या पुतळ्याची तोडफोड ( Mahatma Gandhi Statue Vandalisedy) करण्यात आली आहे. पाठिमागील दोन आठवड्यात सलग घडलेली ही दुसरी घटना आहे. दक्षिण रिचमंड हिल येथील तुळशी मंदिराबाहेर उभ्या असलेल्या पुतळ्याचीही अशीच तोडफोड करण्यात आली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सहा जणांच्या एका टोळक्याने महात्मा गांधी यांच्या स्मारकावर हल्ला केला आणि त्याची तोडफोड केली.

पोलिसांच्या हवाल्याे न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास सहा जणांच्या एका टोळक्याने महात्मा गांधी यांच्या स्मारकावर हल्ला केला आणि स्लेजहॅमरच्या सहाय्याने त्याचे तुकडे केले. पोलिसांनी पुढे म्हटले की, मंगळवार सकाळच्या घटनेतील संशयितांनी घटनास्थळावरून दोन कार, एक पांढरी मर्सिडीज बेंझ आणि एक गडद कार, ( जी शक्यतो टोयोटा कॅमरी जी कदाचित लिव्हरी कॅब म्हणून वापरली जाते) आदीचा वापर करुन घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा, California: डेविस सेंन्ट्रल पार्कातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना, Hate Crime चा तपास करण्याची मागणी)

पोलिसांनी सांगितले की, संशयीतांनी 111 व्या स्ट्रीट मंदिराच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर "kutta," (मराठीमध्ये कुत्रा), "म्हातारा" अशी अक्षरे स्प्रेद्वारे पेंट केली. दरम्यान, मंदिराचे संस्थापक पंडित महाराज म्हणाले, "गांधी शांततेचे प्रतिनिधीत्व करतात. अशा व्यक्तीच्या पुतळ्याची कोणीतरी येऊन तोडफोड करते, पुतळ्याला लक्ष्य करते हे फार क्लेशदायी आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क पोलिस विभागाचे हेट क्राइम टास्क फोर्स 16 ऑगस्टच्या घटनेची चौकशी करत आहे. त्यांना 3 ऑगस्टच्या तोडफोडीचीबाबत माहिती समजली आहे. पोलीस लवकरच गुन्हेगारांपर्यंत पोहोचतील अशी आशा आहे.