Kim Jong Un Health Update: उत्तर कोरिया हुकूमशहा किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर; सर्जरी नंतर ब्रेन डेड असल्याच्या चर्चा
Kim Jong-un | (Photo credit: archived, edited, symbolic images)

उत्तर कोरियाचे North Korea) बहुचर्चित हुकूमशाह किम जोंग उन (Kim- Jong-Un) यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे. अलीकडेच किम यांची कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी झाली होती त्यानंतर आता किम ब्रेन डेड (Brain Dead)  असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे, काही ठिकाणी तर किम यांचा मृत्यू झाल्याचेही म्हंटले जात आहे. यावर अजूनही अधिकृत घोषणा झाली नसली तरी अलीकडेच 15 एप्रिल रोजी किम हे आपल्या आजोबांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनुपस्थित होते त्यावरून या चर्चांनी वेग धरला आहे. जर का किम यांच्या मृत्यूच्या चर्चा खऱ्या ठरल्या तर उत्तर कोरियाची जबाबदारी ही किम यांची बहीण किम यो जोंग (Kim Yo Jong) यांच्यावर सोपवली जाईल अशी शक्यता आहे.

NBC च्या पत्रकाराने आज, 21 एप्रिल रोजी केलेल्या एका ट्विटनुसार, कार्डियाक सर्जरी नंतर किम जोंग ऊन हे ब्रेन डेड झाले आहेत म्हणजेच किम यांचा मेंदू निकामी झाला असून ते कोमात गेले आहेत. दुसऱ्या एका ट्विट मध्ये अजूनही या दाव्याची अधिकृत घोषणा न झाल्याचेही सांगितले आहे.

पहा ट्विट

तर दुसरीकडे अमेरिकेने सुद्धा जर का किम यांचा मृत्यू झाला असेल किंवा होईल अशी परिस्थिती असल्यास उत्तर कोरियाची जबाबदारी कोणावर सोपविता येईल याविषयी चर्चा सुरु केल्याचे म्हंटले जातेय

पहा ट्विट

दरम्यान, या सर्व चर्चांमागील कारण हे अत्यंत मजबूत आहे. पहिले कारण म्हणजे, 15 एप्रिल हा उत्तर कोरिया मधील महत्वाचा सुट्टीचा दिवस आहे, यादिवशी किम II संग यांचा वाढदिवस असल्याने मोठे सेलिब्रेशन असते. याच सोहळ्याला यंदा किम जोंग हे उपस्थित नव्हते. दुसरे कारण म्हणजे, जेव्हा जेव्हा उत्तर कोरिया मध्ये या मुख्य सेलिब्रेशनला कोणी नेता उपस्थित राहत नाही तेव्हा काहीतरी मोठे घडलेले असल्याचा इतिहास आहे.

दुसरीकडे आता किमी यांच्या अनुपस्थितीत उत्तर कोरियात किम यो जोंग यांच्यातर्फे सर्व मुख्य निर्णय घेतले जात आहे. सर्व मुख्य पदांवर आता किम यो जोंग यांचे नाव पर्यायी सदस्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे.