Julian Assange Freed From UK Prison: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांची यूके तुरुंगातून सुटका
Julian Assange | (Photo Credits: X)

विकिलिक्सचे (WikiLeaks) संस्थापक ज्युलियन असांज (Julian Assange) यांची युनायटेड किंगडममधील तुरुंगातून सुटका झाली आहे. विकिलीक्सने याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या कायदा विभागाच्या वाटाघाटीनंतर असांज (वय 52 वर्षे) यांना लंडन येथील सुरक्षा कारागृहातून सोडण्यात (Julian Assange Freed from UK Prison) आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर असांजे आपल्या मायदेशी ऑस्ट्रेलियाला (Australia) जातील. असांजे यांच्यावर हेरगिरीचे 17 आरोप आहेत. अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार, असांज, यूएस राष्ट्रीय संरक्षण दस्तऐवज मिळविण्यासाठी आणि उघड करण्याच्या षड्यंत्राच्या एका गणनेसाठी दोषी ठरेल, असे उत्तर मारियाना बेटांसाठी यूएस जिल्हा न्यायालयात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युलियन असांजला यूकेच्या उच्च-सुरक्षा असलेल्या बेलमार्श तुरुंगातून सोमवारी (25 जून) मुक्त करण्यात आले आणि विमानतळावर नेण्यात आले. जिथे त्याने तो देश सोडला. त्याला बुधवारी सकाळी 9 वाजता (मंगळवार 23:00 GMT) यूएस पॅसिफिक प्रदेश असलेल्या सायपन न्यायालयात शिक्षेसाठी हजर करण्यात येणार आहे. त्याला 62 महिन्यांची शिक्षा सुनावली जाण्याची अपेक्षा आहे. जी त्याने आगोदरच भोगली आहे. (हेही वाचा, WikiLeaks संस्थापक ज्युलियन असांज यांना ब्रिटीश पोलिसांकडून अटक)

''ज्युलियन असांज मुक्त आहे''

असांज याच्या मुक्ततेबाबत माहिती देताना विकिलिक्सने आपल्या एक्स पोस्टद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ज्युलियन असांज मुक्त आहे, 1,901 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर 24 जून रोजी सकाळी ते बेलमार्श कमाल सुरक्षा तुरुंगातून बाहेर पडले. त्याला लंडनमधील उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि दुपारी स्टॅनस्टेड विमानतळावर त्याची सुटका करण्यात आली, जिथे तो विमानात बसला आणि यूकेला निघाला. (हेही वाचा, Nobel Peace Prize Nominations: इलॉन मस्क यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; Donald Trump, Julian Assange यांच्याशी असणार स्पर्धा)

असांजच्या पत्नीने व्यक्त केला आनंद

विकिलिक्सने X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असांज निळ्या शर्ट आणि जीन्समध्ये खाजगी जेटमध्ये चढण्यापूर्वी कागदपत्रावर स्वाक्षरी करताना दिसत आहे. अमेरिकेच्या हद्दीत जाण्यापूर्वी इंधन भरण्यासाठी विमान मंगळवारी बँकॉकमध्ये थांबले. असांजची पत्नी स्टेला हिने या बातमीवर आनंद व्यक्त केला. ती ऑस्ट्रेलियाहून म्हणाली, “मी खूप आनंदित आहे. "न्यायाधीशांनी स्वाक्षरी केल्यावर तो एक मुक्त माणूस होईल."

व्हिडिओ

Julian Assange boards flight at London Stansted Airport at 5PM (BST) Monday June 24th. This is for everyone who worked for his freedom: thank you.#FreedJulianAssange pic.twitter.com/Pqp5pBAhSQ

दरम्यान, ज्युलियन असांजे याच्यावर हेरगीरीचे जवळपास 17 आरोप आहेत. त्यातील 15 हे त्याच्या वेबसाईटवरुन अमेरिकी कागदपत्रांचे प्रकाशन आणि संगणकाचा बेकायदेशीर रित्या वापर यांबाबतचे आहेत. मूळचा ऑस्ट्रेलियाचा असलेला असांजे याने सात वर्षांपूर्वी लंडन येथील इक्वाडोर येथील दूतावासात शरणागती पत्करली. त्यानंतर पाठिमागीलपाच वर्षांपासून तो लंडन येथील तुरुंगात होता. अमेरिकेतील प्रशासनाला वाटते की, त्याने त्याच्यावरील खटला न्यायालयात लढावा तर असांजे याच्या समर्थकांना वाटते ही प्रशासनाची एक राजकीय चाल आहे.