Airstrikes on Hezbollah Headquarters (फोटो सौजन्य -X/@RonenStauber)

Israel-Hamas War: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा बदला इस्रायली लष्कराने (Israeli Army) घेतला आहे. इस्रायली सैन्याने दक्षिण बेरूतमधील हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयाला (Hezbollah's Intelligence Headquarters) लक्ष्य केले. या हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन मोठे नेते मारले गेले आहेत. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यात एलहाग अब्बास सलामेह, राचा अब्बास इचा आणि अहमद अली हसीन हे ठार झाले. इस्त्रायने हिजबुल्लाहच्या भूमिगत शस्त्रास्त्रांच्या कार्यशाळेलाही लक्ष्य केले.

हिजबुल्लाने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इस्रायलच्या सैन्याने शनिवारी सांगितले की, त्यांनी दक्षिण लेबनॉनमधील बोगदा शाफ्ट आणि भूमिगत पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत. रविवारी पहाटे, दोन इस्रायली हल्ल्यांनी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील हरात हरीक परिसराला आणि बहमन रुग्णालयाजवळील निवासी इमारतीला लक्ष्य केले, असे लेबनॉनच्या सरकारी राष्ट्रीय वृत्तसंस्थेने सांगितले. (हेही वाचा -Drone Attack On Benjamin Netanyahu's Home: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला; हिजबुल्लाहचा सर्वात धोकादायक पलटवार)

इस्रायलचा हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयावर हवाई हल्ला - 

रविवारी सकाळी बेरूतच्या उपनगरातून धुराचे लोट उठताना दिसले. इराण-समर्थित गटाने पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या समर्थनार्थ रॉकेट सोडण्यास सुरुवात केली तेव्हापासून इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सीमापार लढाई सुरू झाली. ऑक्टोबर 2023 पासून, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 2,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच 1.2 दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तसेच इस्त्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायल आणि व्यापलेल्या गोलान हाइट्समध्ये 59 लोक मारले गेले आहेत.