Drone Attack On Benjamin Netanyahu's Home (फोटो सौजन्य - X/@soumyajitt)

Drone Attack On Benjamin Netanyahu's Home: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोनने हल्ला (Drone Attack) केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीझेरिया भागात अनेक ड्रोन हल्ले केले आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वैयक्तिक निवासस्थान याच भागात आहे. मात्र, इस्रायलने हिजबुल्लाचे अनेक ड्रोन पाडले.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, ड्रोन लेबनॉनमधून प्रक्षेपित करण्यात आले. हिजबुल्लाने नेतन्याहू यांच्या सीझरिया या किनारपट्टीवरील खाजगी निवासस्थानाला लक्ष्य केले. तथापी शुक्रवारी इस्रायल संरक्षण दलाने पुष्टी केली होती की लेबनॉनमधून एकूण तीन ड्रोन इस्रायलच्या हद्दीत डागण्यात आले आणि इस्रायली सैन्याने तीनपैकी दोन ड्रोन रोखण्यात यश मिळविले. (हेही वाचा -Israeli Attacks on Lebanon: लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यातील मृतांची संख्या 2,255 वर पोहोचली)

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ड्रोनने सीझेरियामधील एका इमारतीला लक्ष्य केले. या भागात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या अहवालानंतर काही वेळातच नेतन्याहू यांच्या कार्यालयाने ड्रोन हल्ल्यात इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाला लक्ष्य केल्याची पुष्टी केली. या प्रकरणावर एका संक्षिप्त निवेदनात, पीएमओने स्पष्ट केले आहे की हल्ल्याच्या वेळी नेतान्याहू आणि त्यांची पत्नी घरी नव्हते. द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही.