Woman Loses Insurance Claim: ख्रिसमस ट्री फेकण्याची स्पर्धा जिंकणे भोवले; महिलेने गमावला तब्बल 7 कोटी रुपयांचा विमा
Insurance Claim | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कार अपघातामध्ये (Car Accident) जखमी झालेल्या एका महिलेचा तब्बल 7 कोटी रुपयांचा ($820,000) अपघात विमा नाकारण्यात (Woman Loses Insurance Claim) आला आहे. कमिला ग्रॅब्स्का असे या महिलेचे नाव आहे. सदर महिला ख्रिसमस ट्री फेकण्याची स्पर्धा (Christmas Tree-Throwing Contest) जिंकली होती. दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होताना सदर महिला अपघात झाला होता. या अपघातामुळे पाठ आणि मानेला दुखापत झाली आहे. ज्यामुळे तिला पाच वर्षांहून अधिक काळ काम करता आले नाही आणि तिच्या मुलांसोबत खेळण्याची क्षमताही धोक्यात आल्याचा दावा तिने विमा मागताना केला होता.

न्यायालयाने फेटाळला महिलेचा दावा

महिलेचा विमा नाकारणाऱ्या कंपनीने दावा केला होता की, कथीत अपघातानंतर सदर महिला (ग्रॅब्स्का) एका धर्मादाय कार्यक्रमात सहभागी झाली होती. ज्यामध्ये ख्रिसमस ट्री फेकण्याच्या स्पर्धेचा समावेश होता. या स्पर्धेत ही महिला केवळ सहभागीच झाली नव्हती तर तीने ही स्पर्धा जिंकली देखील होती. महिलेचा उत्साहाने 5 फूट ख्रिसमस ट्री फेकताना छायाचित्रण (व्हिडिओ) पुराव्यासह कोर्टाला सादर करण्यात आले. न्यायालयाने सर्व छायाचित्रण पाहिले आणि अपघाताची कारणमिमांसा करत सदर महिलेचा दावा फेटाळला. महिलेचा दावा आणि अपघात यांमध्ये प्रचंड विसंगती असल्याचे मत कोर्टाने नोंदवले. (हेही वाचा, Investment Scam: गुंतवणूक घोटाळा; 73 वर्षीय उद्योजकाची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक; कापड कारखाना मालकास अटक)

विमान कंपनीने सादर केला पुरावा

लिमेरिकमधील न्यायमूर्ती कार्मेल स्टीवर्ट यांच्या कोर्टासमोर हा खटला चालला. कोर्टाने असा निष्कर्ष काढला की ख्रिसमस ट्री फेकणारी ग्रॅब्स्का ही दिशाभूल करते आहे. व्हिडिओमध्ये ती अत्यंत वेगवान आणि सहजतनेने हालचाल करताना दिसत आहे. तिची चपळता नजरेत भरणारी आहे. त्यामुळे अपघातामुळे झालेल्या दुखापतीमुळे ती हालचाल करु शकत नाही या दाव्याला आधार मिळत नाही. उलट तिचा दावा काहीसा अतिशयोक्तीपूर्ण वाटतो आहे. ग्रॅब्स्काने मात्र दुखापतींचा बनाव केल्याचा आरोप फेटाळून लावला. वेदना होत असूनही आपण सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हटले. यावर तिच्या कुत्र्याला ती पार्कमध्ये अगदी चपळाईने प्रशीक्षण देतानाचाएक व्हिडिओ कोर्टा सादर करण्यात आला. ज्यामुळे तिचा दावा अधिकच कमकूवत झाला. (हेही वाचा, Christmas 2023: 'सांताक्लॉज', 'ख्रिसमस ट्री'चा इतिहास काय आहे? जाणून घ्या या उत्सवाची सुरुवात कशी झाली)

हे प्रकरण विदेशातील असले तरी, जवळपास सर्वच देशांमध्ये लागू होणारे आहे. अनेक नागरिक सुरक्षा कवच म्हणून विमा उतरवतात खरे. मात्र, कधी अप्रिय घटना घडलीच तर विमान मिळविण्यासाठी दावा करताना त्यात असंख्य चुका करतात. अशा वेळी अनेकदा दवा नाकरला जाण्याची शक्यता असते.