Christmas 2023: येशू ख्रिस्ताच्या (Jesus Christ) जन्मानिमित्त साजरा करण्यात येणारा ख्रिसमस (Christmas 2023) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा दिवस साजरा करणारे लोक आपली घरे सजवण्यात आणि आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठी भेटवस्तू खरेदी करण्यात व्यस्त आहेत. या दिवशी लोक चर्चमध्ये जातात, कॅरोल गातात, एकमेकांना भेटवस्तू देतात. तसेच घरामध्ये ख्रिसमस ट्री (Christmas Tree) आकर्षक पद्धतीने सजवतात. ख्रिसमस सणात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सांताक्लॉज (Santa Claus). हे नाव ऐकताच आपल्या मनात लाल रंगाचा सूट घातलेला, पांढरी दाढी-मिशी असलेला, पाठीवर भेटवस्तूंनी भरलेली बॅग घेऊन बसलेल्या माणसाची प्रतिमा उभी राहते. आज आम्ही तुम्हाला ख्रिसमस सणाचा इतिहास काय आहे, ख्रिसमस ट्री कधीपासून अस्तित्वात आला आणि सांताक्लॉजमागील रहस्य काय आहे? याबद्दल सांगणार आहोत.
ख्रिसमसची सुरुवात कशी झाली?
ख्रिश्चन धर्म अस्तित्वात येण्यापूर्वी लोक हिवाळ्यातील सर्वात गडद रात्री प्राण्यांचे बळी देऊन हा दिवस साजरा करत असतं. आधुनिक ख्रिसमस चौथ्या शतकात सुरू झाला असे मानले जाते. परंतु त्याची तारीख 25 डिसेंबर, येशू ख्रिस्ताची जन्मतारीख या आधारावर निवडली गेली नव्हती. असे म्हटले जाते की पोप ज्युलियस प्रथम यांनी सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामात साजरे होणारे सण लक्षात घेऊन ही तारीख धोरणात्मकपणे दिली होती. जेणेकरून अधिकाधिक लोक हा सण साजरा करू लागतील. याचा उगम रोमन आणि इतर युरोपीय सणांतून झाल्याचेही सांगितले जाते. (हेही वाचा - Best Places To Visit For Christmas Celebration: ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील सर्वोत्तम)
ख्रिसमस ट्री चा इतिहास?
घरामध्ये ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा जर्मनीमध्ये सुरू झाली. 1700 मध्ये ते इतरत्रही स्वीकारले जाऊ लागले. प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनचा नेता मार्टिन ल्यूथरने घराच्या आत तारेमय आकाश वातावरण निर्माण करण्यासाठी झाडावर जळत्या मेणबत्त्या ठेवल्या. इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री परंपरा 1840 मध्ये सुरू झाली. याचे श्रेय राणी व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट यांना जाते. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत, मेणबत्त्या, घरगुती सजावट, टॉफी-चॉकलेट आणि भेटवस्तूंनी भरलेला ख्रिसमस ट्री ही संकल्पना मध्यमवर्गीय घरांमध्ये खूप लोकप्रिय झाली. (हेही वाचा - Best Christmas Celebration Places in Mumbai: यंदा ख्रिसमस पार्टीचा आनंद घ्यायचा असेल तर मुंबईतील 'या' खास ठिकाणी द्या भेट)
सांताक्लॉजचा इतिहास?
सांताक्लॉजचे मूळ बहुतेक वेळा प्रसिद्ध सॉफ्टड्रिंक ब्रँड कोका-कोलाशी जोडलेले असते. याच कंपनीने हे काम 1931 मध्ये चित्रकार हॅडन संडब्लॉम यांना दिले, त्यानंतर फुगलेले गाल, पांढरी दाढी आणि लाल सूट घातलेल्या माणसाचे प्रतिकात्मक चित्र अस्तित्वात आले. परंतु, सांताक्लॉजची प्रेरणा कोठून आली याचा इतिहास शतकानुशतके (280 एडी) दयाळू संत निकोलसपर्यंत जातो. डच लोक अजूनही 6 डिसेंबरला सेंट निकोलसला 'सिंटरक्लास' म्हणून स्मरणात ठेवतात आणि 5 डिसेंबरला मिठाई आणि भेटवस्तू वाटतात.
मेणबत्त्या पेटवण्याची परंपरा -
ख्रिसमसच्या निमित्ताने फुलांमध्ये मेणबत्त्या पेटवण्याची सुरुवात जर्मनीमध्ये 1833 मध्ये झाली. जेव्हा ख्रिसमसची कथा सांगताना एका लुथरन धर्मगुरूने मेणबत्त्या पेटवल्या. यानंतर, धार्मिक परंपरेनुसार कुटुंबांनी लहान मेणबत्त्या बनवण्यास सुरुवात केली. हे 'लाइट ऑफ द वर्ल्ड' म्हणजेच लख्ख जगाचे प्रतीक मानले जाते. 19व्या शतकाच्या अखेरीस ते अधिक सुशोभित झाले. मेणबत्त्यांची जागा दागिने, बेरी, पाइनकोन्स इत्यादींनी घेतली. लोकांनीही आपापल्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वागताच्या पाट्या लावायला सुरुवात केली.
ख्रिसमस कार्ड पाठवायला कधी सुरुवात झाली?
पहिले ख्रिसमस कार्ड 1611 मध्ये मायकेल मेयर या जर्मन चिकित्सकाने राजा जेम्स I आणि प्रिन्स ऑफ वेल्स यांना पाठवले होते. यामध्ये त्यांनी या सणासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 1843 मध्ये, सर हेन्री कोल या सिव्हिल सेवकाने जॉन कॅलकट हॉर्सलीला ख्रिसमस कार्ड डिझाइन करण्यासाठी नियुक्त केले. त्याच वेळी, 1870 च्या दशकात, स्वस्त कार्डे दिसू लागली जी खूप लोकप्रिय होऊ लागली. यानंतर, ख्रिसमसच्या निमित्ताने अभिनंदन संदेश पाठविण्यासाठी कार्ड वापरणे ही एक परंपरा बनली जी आजही सुरू आहे.