iPhone Blast in China (Photo Credits: X/@choqao)

iPhone Blast in China: याआधी जगभरात अनेकवेळा चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र आता चक्क ॲपल (Apple) च्या महागड्या iPhone 14 Pro Max चा स्फोट झाला आहे. ॲपलच्या या प्रीमियम आयफोनमध्ये स्फोट झाल्याने युजरचे हात भाजले आहेत. ॲपलने आयफोन स्फोटाबाबत अधिकृत निवेदन जारी केले असून, स्फोट झालेल्या आयफोनची चौकशी करण्यास सांगितले आहे. ॲपलचा आयफोन फुटण्याची ही पहिलीच घटना आहे. हे प्रकरण चीनमधून समोर आले आहे. रिपोर्टनुसार, शांक्सी नावाच्या महिला युजरच्या iPhone 14 Pro Max चा स्फोट झाला आहे.

अहवालानुसार सकाळी साडेसहा वाजता फोनला आग लागली. त्यावेळी युजर झोपली होती, स्फोटाच्या आवाजाने ती जागी झाली. तिच्या बेडशेजारी फोन चार्ज होत होता. महिलेने चुकून तिचा हात फोनला, त्यामुळे ती जखमी झाली. चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलेने ब्लास्ट झालेल्या iPhone 14 Pro Max चा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये फोनचा पुढचा आणि मागचा भाग जळालेला दिसत आहे.

महिलेने हा आयफोन 2022 मध्ये खरेदी केला होता. अशा परिस्थितीत फोनची वॉरंटी संपली आहे. ॲपलने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीच्या कस्टमर केअरने या घटनेवर शोक व्यक्त केला असून, आधी फोन परत मिळवून त्याची तपासणी करून स्फोटाचे कारण शोधून काढले जाईल, असे सांगितले. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान सर्वप्रथम हे पाहिले जाईल की फोनमध्ये ॲपलची मूळ बॅटरी बसवली आहे की नाही. यानंतर फोनचे इतर घटक तपासले जातील.

आयफोनमध्ये ही आग कशामुळे लागली हे सध्या स्पष्ट झालेले नाही. मात्र, फोन चार्ज करताना आपण अनेकदा अनेक चुका करतो, ज्या नंतर हानिकारक ठरतात. (हेही वाचा: Mobile Phone Blast: कानपूरमध्ये इअरफोनसह आणि विना हेल्मेट स्कूटर चालवत असताना मोबाईल फोनचा स्फोट; महिलेचा मृत्यू)

या गोष्टी लक्षात ठेवा-

  • रात्री फोन चार्जला ठेऊन झोपू नये. जास्त चार्जिंगमुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग होऊ शकते.
  • तुमचा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी, फक्त अस्सल चार्जर वापरा म्हणजेच फोन नेहमी फोनसोबत दिलेल्या सुसंगत चार्जरनेच चार्ज करा.
  • तुम्ही इतर कोणतेही सुसंगत चार्जर वापरत असाल, तर त्याच्या ॲडॉप्टरवरील आउटपुट व्होल्टेज तपासा. जर, आउटपुट व्होल्टेज 5V पेक्षा जास्त किंवा कमी नसावे. साधारणपणे फोन चार्ज करण्यासाठी इतका व्होल्टेज लागतो.
  • फोन चार्ज करण्यासाठी ठेवण्यापूर्वी, चार्जिंग सॉकेटदेखील तपासणे आवश्यक आहे. काही वेळा लूज कनेक्शनमुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो.
  • फोन चार्ज करण्यापूर्वी त्याचा चार्जिंग पोर्ट नक्की तपासा. चार्जिंग पोर्टमध्ये जर काही ओलावा असेल तर ते कोरड्या कापडाने कोरडा करा. त्यानंतरच फोन चार्जवर ठेवा.