India's helping hand to Myanmar | ANI

Myanmar Earthquake: म्यानमार (Myanmar)मध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे (Earthquake) मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत भारताने म्यानमारला मदत म्हणून 15 टन मदत साहित्य पाठवले आहे. भारतीय हवाई दलाच्या हिंडन स्टेशनवरून भारतीय हवाई दलाच्या (IAF) C-130J विमानाने म्यानमारला मदत साहित्य पाठवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत पॅकेजमध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार अन्न, पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र, स्वच्छता किट, सौर दिवे, जनरेटर सेट आणि पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, सिरिंज, हातमोजे आणि बँडेज यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.

म्यानमारमध्ये भूकंपामुळे महाविनाश -

म्यानमारमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. यामुळे केवळ म्यानमारमध्येच नाही तर थायलंडमध्येही बरेच नुकसान झाले आहे. भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे, म्यानमारमध्ये दिवसभर भूकंपाचे अनेक धक्के जाणवले असताना, रात्री 11:56 वाजता 4.2 तीव्रतेचा भूकंपही नोंदवण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती. त्याचे केंद्र म्यानमारमधील मंडाले शहराजवळ होते. म्यानमारमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तथापि, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा -Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंपामुळे मशीद उद्ध्वस्त! 20 जणांचा मृत्यू, ईदचा आनंद शोक सभेत बदलला)

थायलंडमध्येही भूकंपाचे थक्के -

दरम्यान, शुक्रवारी सकाळी 11:50 वाजता बँकॉक आणि थायलंडच्या अनेक भागात हा शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या तीव्रतेमुळे सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये स्विमिंग पूलमधून पाणी बाहेर येत असल्याचे दिसून आले. (Earthquake In Myanmar-Thailand: म्यानमार-थायलंडमध्ये भूंकप! पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांना दिला मदतीचा हात)

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता -

तत्पूर्वी, शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घडीला भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, 'म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल मला चिंता आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.'