US on India–Russia Foreign Relations: अमेरिकेने (US) भारताच्या परराष्ट्र संबंधावर(Foreign Relations Of India) प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारत आणि रशिया यांच्यातील परराष्ट्र संबंध (India–Russia Foreign Relations) दीर्घकालीन आहेत. त्यामुळे ते बदलण्यास वेळ लागेल. त्यामुळे भारताला आपले परराष्ट्र संबंध झुकविण्यासाठी बराच वेळ लागेल. अमेरिकेने पुढे म्हटले आहे की, अमेरिका भारतासह चार देशांच्या सुरक्षा संवाद (QUAD) तसेच इतरही माध्यमांतून भारतासोबत अधिक जवळकीने काम करत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता नेड प्राईस यांनी (Ned Price) भारताकडून रशियाचे तेल, खते आणि भविष्यातील संरक्षण प्रणाली खरेदी करण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रस्नाला उत्तर देताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशन म्हटले की, इतर कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाबद्दल बोलणे हे माझे काम नव्हे.
नेड प्राईस यांनी पुढे म्हटले की, भारताकडून आम्ही जे ऐकले आहे त्याबाबत मी नक्कीच भाष्य करु शकतो. आम्ही जगभरातील देशांना यूक्रेन (Ukraine) वर रशियाने केलेल्या हल्ल्यांविरोधात संयुक्त राष्ट्र संघटनेत आपले मत आणि इतरही मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. आम्ही हेही समजतो की, जसे की मी काही वेळापूर्वीच म्हटले की, एखाद्या राष्ट्रासोबतचे परराष्ट्र धोरण हे विजेचे बटन दाबावे तसे बदलता येत नाही. (हेही वाचा, Nancy Pelosi Taiwan Visit: चीनच्या नाकावर टिच्चून अमेरिकेने दिला तैवानला पाठींबा; नॅन्सी पेलोसी यांची भेट ड्रॅगनसाठी ठरली डोकेदुखी )
पुढच्या एका प्रश्नाच्या उत्तरात प्राईस यांनी म्हटले की, प्रामुख्याने ही समस्या त्या देशांसोबत निर्माण होते ज्या देशांचे आंतरराष्ट्रीय संबंध हे ऐतिहासिक असतात. जसे की भारताच्या बाबतीत आहे. भारताचे त्यांच्यासोबत (रशिया) संबंध हे अतिशय जुने आणि ऐतिहासिक आहेत. भारताला आपल्या परराष्ट्र धोरणात रशियाकडचा कल बदलण्यास विलंब लागणार आहे. युक्रेनवर रशियाने 24 फेब्रुवारी रोजी हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिका आणि यूरेपीय देशांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले. भारताने पश्चिमी देशांवर टीका करण्याशिवाय यूक्रेनच्या युद्धानंतर तेल आयात वाढवली आहे. तसेच, रशियासोबतचा व्यापारही कायम ठेवला आहे.
रशिया हा मे महिन्यात सऊदी अरब (Saudi Arab)ला पाठिमागे टाकत भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार बनला होता. या काळात भारतीय तेल कंपन्यांनी मे महिन्यात 2.5 कोटी रुपयांचे तेल बॅरल आयात केले होते.